आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोऱ्यांची एक्स्प्रेस सुसाट, गुन्हेगारीचा आढावा ३० लाखांचा मुद्देमाल लंपास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - रेल्वेतील चोऱ्यांचे प्रमाण गेल्या काही काळापासून वाढले आहे. विशेष करून मुंबईकडून नागपूर, भोपाळकडे जाणाऱ्या गाड्यांमध्येच चोऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. गेल्या तीन महिन्यात भुसावळ जीआरपी पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात, रेल्वेतील चोरी प्रकरणाचे ८३ गुन्हे दाखल झाले आहेत. यात एकूण २९ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबवला आहे. ही आकडेवारी चोऱ्यांची एक्स्प्रेस सुसाट असल्याचे संकेत देणारी आहे.

भुसावळ हे रेल्वेचे जंक्शन स्थानक आहे. स्थानकावर येणाऱ्या प्रत्येक प्रवासी गाडीला १० ते १५ मिनिटे थांबा असतो. याच काळात चोरटे हातसफाई करतात. त्यामुळे लोहमार्ग पोलिस ठाण्यात (जीआरपी) दररोज कोणत्या ना कोणत्या स्वरुपाचा गुन्हा दाखल होतो. दररोज किमान एक या वेगाने दरमहा जीआरपी पोलिस ठाण्यात २५ ते २८ गुन्हे दाखल होतात. तसेच स्थानकाबाहेर घडलेले अनेक गुन्हे, शून्य क्रमांकाने जीआरपी ठाण्यात दाखल होतात. धावत्या गाड्यांमधील चोरीच्या घटनाही वाढल्या आहेत. काही काळापूर्वी नाशिक ते इगतपुरी या स्थानकांदरम्यान पंजाब मेल गाडीत लूटमार झाली होती.

रात्रीचीगस्त व्हावी कडक :रात्री धावणाऱ्या गाड्यांमध्ये पोलिस गस्त महत्त्वाची आहे. त्यामुळे आरपीएफ जवानांची संख्या वाढल्यास ही समस्या सुटू शकते. त्यामुळे आरपीएफने कठोर पावले उचलून अनधिकृत विक्रेत्यांवरही वेळीच चाप बसवण्याची गरज निर्माण झाली आहे.

मे महिन्यात लाख १२ हजारांचा, जूनमध्ये १२ लाख २३ हजारांचा, तर जुलैत लाख ३० हजारांचा ऐवज लंपास झाला.

रेल्वेतील चोरीच्या दाखल गुन्ह्यांमध्ये, शून्य क्रमांकाने येणाऱ्या गुन्ह्यांची संख्या जास्त आहे. तरीही गुन्हे दाखल करून आरोपींचा शोध घेत आहोत. अद्याप तीन गुन्ह्यांमध्ये १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींच्या शोधासाठी तसेच संशयितांवर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र पथक नियुक्त केले आहे. प्रवाशांनी मौल्यवान वस्तू प्रवासात साेबत घेऊ नये. संशयितांची माहिती तत्काळ पोलिसांना द्यावी. आनंदमहाजन, पोलिस निरीक्षक, जीआरपी ठाणे, भुसावळ

९५ टक्के गुन्हे शून्य क्रमांकाचे : भुसावळजंक्शनवरील जीआरपी पोलिस ठाण्यात दाखल होणाऱ्या गुन्ह्यांपैकी, जवळपास ९५ टक्के गुन्हे हे शून्य क्रमांकाने दाखल होतात. फिर्याद देणाऱ्या प्रवाशांना विभागातील इतर स्थानकांच्या तुलनेत भुसावळचेच नाव माहीत असते. तसेच भुसावळ स्थानकावर गाड्या जास्त वेळ थांबत असल्याने, याच ठिकाणी चोरी झाली असावी, असा अंदाज व्यक्त केला जातो. त्यामुळे भुसावळ येथील जीआरपी पोलिस ठाण्यात शून्य क्रमांकाने गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण अधिक असते.
जूनमध्ये२५ गुन्हे : जूनमहिन्यात १४ रोजी पुष्पक एक्स्प्रेसमधून लाख १५ हजार रुपये तर, २५ जूनला विदर्भ एक्स्प्रेसमधून लाख १६ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला. जून महिन्यात एकूण २५ गुन्हे दाखल झाले. त्यात १२ लाख २३ हजारांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची नोंद झाली. त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
मेमहिन्यातही आलेख वाढता :मे महिन्यात जीआरपी पोलिस ठाण्यात एकूण २६ गुन्हे दाखल झाले आहेत. १२ मे रोजी काशी एक्स्प्रेसमधून प्रवाशाचा लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेला. याच महिन्यात २१ मे रोजी पठाण कोटमधून लाख तर पंजाब मेल मधून १७ मे रोजी ९४ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला. मे महिन्यात झालेल्या चोऱ्यांमध्ये एकूण लाख ७२ हजार रुपयांचा ऐवज लांबवण्यात आला.
जुलै महिन्यातील चोरीच्या घटना

दिनांकगाडीचे नाव लंपास रक्कम
जुलैविदर्भ प्रेरणा एक्स्प्रेस ३८ हजार
जुलै हुतात्मा एक्स्प्रेस १२ हजार ९००
जुलै दुरंतो, ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस २० हजार ५००
जुलै मुंबई अमरावती एक्स्प्रेस हजार
जुलै कामायनी, ओखा रामेश्वर ४२ हजार ३९९
जुलै पुणे नागपूर एक्स्प्रेस ११५०० हजार
१० जुलै पंजाब मेल २४ हजार
१२ जुलै बांद्रा पटना एक्स्प्रेस २० हजार
१३ जुलै विदर्भ एक्स्प्रेस ९६ हजार २००
१४ जुलै ज्ञानेश्वरी, कुर्ला भुवनेश्वर २६ हजार ५००
१५ जुलै गीतांजली, लष्कर एक्स्प्रेस २६ हजार
१६ जुलै अहमदाबाद पुरी ४९ हजार
१७ जुलै पुणे अजमेर, कामायनी १४ हजार
१९ जुलै लखनऊ पुणे ३५ हजार ८००
२० जुलै मुंबई अमरावती ९९ हजार २००
२२ जुलै महाराष्ट्र एक्स्प्रेस ७७ हजार
२३ जुलै वाराणसी मुंबई ३६ हजार ५००
२७ जुलै पुरी अजमेर ४७ हजार
२८ जुलै अहमदाबाद पुरी ३१ हजार
२९ जुलै मंगला, सचखंड ६८ हजार
३० जुलै नवजीवन, गोवा एक्स्प्रेस ३४ हजार ९००
३१ जुलै विदर्भ एक्स्प्रेस १८ हजार