आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुसावळ शहरात भुरट्या चोरांचा उपद्रव; गस्त गरजेची

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या चोरट्याचा मुकाबला करत त्याला हुसकावून लावण्याचे धाडस येथील पत्रकार संजयसिंग चव्हाण यांनी दाखवले. रविवारी मध्यरात्री झालेल्या या प्रकाराची माहिती देण्यासाठी बाजारपेठ पोलिस ठाण्यात दूरध्वनी करूनही उपयोग झाला नाही.
रविवारी रात्री राजस्थान मार्बलच्या मागील परिसरात रात्री 1.30 वाजेच्या सुमारास चोरट्याने सहा फूट उंच भिंतीवरून उडी मारत गुलाबसिंग पाटील यांच्या घरात प्रवेश केला. ही चाहूल लागताच गुलाबसिंग यांना जाग आली. मात्र, जिवाच्या भीतीपोटी त्यांच्या परिवाराने शांत राहत शेजारी राहणारे पत्रकार संजयसिंग चव्हाण यांना मोबाइलवरून माहिती दिली. चव्हाण व अशोक पाटील यांनी समयसूचकता आणि धाडस दाखवून चोरट्याला पकडून चोप दिला. यासंदर्भात बाजारपेठ पोलिसांना माहिती देण्यासाठी दूरध्वनी लावला मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही.
नागरिक झाले भयभीत - कलानगर भागात पूर्वी पोलिसांची नियमित गस्त होती. पण 12 नोव्हेंबर 11 पासून ही गस्त बंद करण्यात आली आहे. रात्रीच्या गस्तीवरील पोलिसांच्या स्वाक्षरीसाठी ठेवलेल्या नोटबुकात कुणाचीही स्वाक्षरी नाही. नागरिकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी गस्त महत्त्वाची आहे. - संजयसिंग चव्हाण, कलानगर, भुसावळ