आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिक्षामधून उतरताना खांद्यावरील, १० लाख रुपयांची बॅग लांबवली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - सासऱ्याकडून उसनवार घेतलेले १० लाख रुपये परत करण्यासाठी मुंबईला निघालेल्या इस्टेट ब्रोकरची बॅग बहिणाबाई उद्यानाजवळ बाइकस्वारांनी लांबवल्याची घटना रविवारी रात्री घडली. शिवाजीनगरातील इस्टेट ब्रोकर शेख अर्शद शेख सलीम ट्रॅव्हल्सचे मुंबईला जाण्यासाठी रिक्षाने निघाले होते. गॅस संपल्यामुळे रिक्षा थांबताच रिक्षातून प्रवासाचे इतर सामान काढताना त्यांनी बॅग खांद्यावर लटकवली होती.त्या वेळी बहिणाबाई उद्यानाजवळून भरधाव आलेल्या बाइकस्वारांनी अर्शद यांच्या हाताला झटका देत त्यांची बॅग लांबवली. तोंडाला रुमाल बांधलेल्या दोन चोरट्यांनी डोळ्यांची पापणी लवण्याच्या अात बॅग उडवून ते महामार्गावरून सुसाट वेगात धुळ्याच्या दिशेने पसार झाले.
एरवी गजबजलेल्या बहिणाबाई उद्यानाजवळ रविवारी पावसामुळे फारशी वर्दळ नव्हती.त्याचा फायदा घेत चोरट्यांनी हा डाव साधला. तोंडाला रुमाल बांधलेल्या या चोरट्यांच्या मोटारसायकलवर नंबर नव्हता. गेल्या महिनाभरापासून चोऱ्या, घरफाेड्यांचे सत्र सुरु असतानाच बॅग लांबवण्याची सुद्धा ही तिसरी घटना अाहे. विशेष म्हणजे बॅगचोरीच्या तीन प्रकरणातील केवळ एक संशयित पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. शिवाजीनगर परिसरातील उस्मानिया पार्क येथील इस्टेट ब्राेकर शेख अर्शद शेख सलीम (वय ४२) यांनी त्यांचे मालाड (मुंबई) येथील त्यांचे चुलत सासरे सिराज खान यांच्याकडून प्लाॅट घेण्यासाठी १० लाख रुपये उसनवार घेतले हाेते. त्यांना ते परत द्यायचे असल्याने शुक्रवारी अायडीबीअाय बँंकेच्या खान्देश सेंट्रल माॅल येथील शाखेतून १० लाख रुपये काढले. मात्र गेल्या दाेन दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने मुंबईतील परिस्थिती बिकट हाेती. त्यामुळे त्यांनी जाण्याचे टाळले. पण पाऊस कमी होताच त्यांनी अाकाश ट्रॅव्हल्सकडून मुंबईला जाण्यासाठी रात्रीच्या गाडीचे बुकिंग केले होते.

काेल्हेनगरातील बंद घर चाेरट्यांनी फाेडले
काेल्हेनगरातील महिनाभरापासून बंद असलेले घर चाेरट्यांनी फाेडल्याचे रविवारी उघडकीस आले. चाेरट्यांनी घरातील १६ हजारांचा एेवज चोरून नेला आहे. काेल्हेनगरातील जगन्नाथ भानुदास पाटील हे सध्या मुंबईतील विक्राेळी (पश्चिम) येथे राहतात. त्यांचे काेल्हेनगरातील घर गेल्या महिनाभरापासून बंद अाहे. रविवारी ते जळगावी अाल्यानंतर त्यांना घराचा कडी-काेयंडा तुटलेला दिसला. घरातील कपाटाचे लाॅकर ताेडून सामान अस्ताव्यस्त फेकलेले हाेते. याप्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

रात्री वाजेच्या गाडीने अग्रवाल हाॅस्पिटलजवळून अर्शद शेख हे अाकाश ट्रॅव्हल्सने मुंबई येथे जाणार हाेते. त्यांच्या साेबत शिक्षिका असलेल्या त्यांच्या पत्नी मेहरून्नीसा अर्शद शेख अाणि सासू नजमुन्नीसा खान यासुद्धा जाणार हाेत्या. त्यामुळे शिवाजीनगरातून अर्शद यांनी रिक्षा (क्र. एमएच- १९-व्ही- ६४०१) घराजवळ बाेलावली. जिल्हापेठ पाेलिस ठाण्याच्या पुढे काही अंतर गेल्यावर रिक्षातील गॅस संपला. मात्र तरीही चालक ब्रुक बॉण्ड काॅलनीच्या रस्त्यावरून काही अंतर रिक्षा पुढे घेऊन गेला. मात्र महामार्गाच्या अलीकडेच रिक्षा पुन्हा बंद पडली. त्यामुळे अर्शद यांनी पायीच जाण्याचा निर्णय घेतला. ते रिक्षातून सामान खाली उतरवत हाेते. त्या वेळी १० लाख रुपये असलेली बॅग त्यांच्या खांद्यावर लटकवलेली हाेती. रिक्षा मधील इतर बॅग खाली उतरवत असताना बहिणाबाई उद्यानाच्या दिशेने काळ्या रंगाच्या विनाक्रमांकाच्या माेटारसायकलवरून अालेल्या दाेन तरुणांनी बॅगला हिसका दिला आणि काही कळायच्या आत बॅग उडवून चाेरटे धुळ्याच्या दिशेने सुसाट वेगाने निघून गेले. दाेन्ही चाेरट्यांनी ताेंडाला रुमाल बांधलेले हाेते. याप्रकरणी अर्शद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पाेलिस ठाण्यात रविवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात अाला.

महिनाभरातील तिसरी घटना रिक्षाचा गॅस संपल्याने झाला घात
शहरात गेल्या महिनाभरात पैसे लांबविल्याच्या तीन माेठ्या घटना घडल्या अाहेत. त्यात १८ जुलैला दुपारी वाजेच्या सुमारास कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जवळून धान्य व्यापाऱ्याचे ५४ लाख, २१ जुलैला दुपारी वाजेच्या सुमारास लाेकप्रिय रेस्टॉरंट जवळून कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या माेटारसायकलवरून ७८ हजार अाणि रविवारी बहिणाबाई उद्यानाजवळून १० लाख रुपयांची बॅग चाेरट्यांनी लंपास केली अाहे. त्यापैकी केवळ लाेकप्रिय रेस्टॉरंट जवळील चाेरीतील एक संशयित शहर पाेेलिसांच्या हाती लागला. मात्र त्याच्याकडूनही काही ठाेस माहिती पाेेलिसांच्या हाती लागली नाही.
बातम्या आणखी आहेत...