आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांच्या हातात तुरी देत चोरट्याचे पलायन, ‘फोटोसेशन’च्या नादात पोलिस ठाण्यातून पसार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोहन भारूळे याला पकडून घेऊन जाताना पोलिस कर्मचारी. - Divya Marathi
मोहन भारूळे याला पकडून घेऊन जाताना पोलिस कर्मचारी.
जळगाव - मोबाइल चोरट्याला पकडून आणल्यानंतर त्याच्या सोबत ‘फोटोसेशन’ करण्याच्या नादात बराच वेळ पोलिसांनी वाया घालवला. त्याला कोठडीत टाकल्यामुळे अखेर संधीचा फायदा घेत चोरट्याने पोलिसांच्या हाती तुरी देत पलायन केले. शनिपेठ पोलिस ठाण्यात बुधवारी सायंकाळी वाजता हा प्रकार घडला. मोहन प्रकाश भारूळे असे चोरट्याचे नाव आहे. 
 
अॉगस्ट रोजी जामनेर शहरातील इंद्र ललवाणीनगरातील शुभम संजू पाटील (वय २०) हा कामानिमित्त जळगावला आला होता. दुपारी १२.४० वाजता तो जामनेरला परत जाण्यासाठी बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत भारूळे (वय २०, रा.कोळीपेठ) याने त्याच्या खिशातील २० हजार रूपये किमतीचा मोबाईल चोरला होता. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, शनिपेठ पोलिस ठाण्याचे डिबी कर्मचारी जितेंद्र सोनवणे अमित बाविस्कर यांना बसस्थानकावरील मोबाइल चोरटा कोळीपेठेतील असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक सुरेश सपकाळे, सोनवणे, बाविस्कर, गणेश गव्हाळे यांच्या पथकाने संशयित भारूळे याला बुधवारी सकाळी १० वाजता सापळा रचून अटक केली. त्याची झडती घेतलीअसता त्याच्याकडून ललवाणी याचा मोबाइल मिळून आला होता. हा मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे. चोरटा भारूळे सांयकाळी वाजता पोलिसांच्या ताब्यातून पळून गेला. 
 
असे नडले फोटोसेशन : भारूळेयाला पकडून आणल्यानंतर सुरुवातीला ठाणे अंमलदाराच्या टेबलसमोर उभे करण्यात आले. त्यानंतर काही तासांनी डीबीच्या कर्मचाऱ्यांनी फोटोसेशन करण्यासाठी इतर कर्मचाऱ्यांसह पोलिस निरीक्षक प्रवीण वाडीले यांना बोलावले. वाडिले आल्यानंतर भारूळे याला पुन्हा पोलिस ठाण्याच्या बाहेर नेऊन पथकाने त्याला पकडून आणत असल्याची ‘पोझ’ देत फोटो काढण्यात आला. यानंतर संबधित पोलिस कर्मचारी, अधिकारी यांनी हे फोटो बातमी सोशल मिडीयावरून वरिष्ठ अधिकारी तसेच माध्यमांपर्यंत पोहचवली. दरम्यान, फोटोसेशनच्या वेळी संशयित भारूळेला ठाण्याच्या बाहेर नेऊन आत आणल्यानंतर पुन्हा ठाणे अंमलदारजवळच उभे केले होते. फोटो काढून झाल्यानंतर सर्व कर्मचारी दुसऱ्या कामात बिझी झाले. त्यामुळे भारूळेकडे कोणाचेच लक्ष नव्हते. सायंकाळपर्यंत संशयिताला बेड्या घातल्या नाहीत, लॉकअप मध्येही टाकण्यात आले नाही किंवा जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यातही दिले नव्हते. सुस्तावलेल्या कर्मचाऱ्यांची नजर चूकवून सायंकाळी वाजता भारूळेने मुख्य प्रवेशद्वारातूनच पळ काढला. 
 
रात्रभर शोध मोहीम 
हातात लागलेला संशयित पळून गेल्यामुळे शनिपेठ पोलिसांची चांगलीच भंबेरी उडाली. भारुळेच्या शोधासाठी सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जंगजंग पछाडले. शनिपेठ, कांचननगर, कोळीपेठ, शिवाजीनगर, गेंदालाल मिल अशा सर्वच भागात पोलिसांनी गस्त करून त्याचा शोध घेतला. रेकॉर्डवरील आरोपींकडूनही माहिती घेण्यात आली. मात्र भारूळे हाती लागला नाही. 

रामानंदनगर पोलिस ठाण्याची आठवण 
दोन वर्षांपूर्वी रामानंदनगर पोलिसांनी गणेश काळे (रा.) चाेरट्याला अटक केली होती. तो काही तासांतच पोलिस ठाण्यातील तारांची जाळी वाकवून पळून गेला होता. या प्रकरणात तत्कालीन पोलिस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी दोन कर्मचाऱ्यांना निलंबित केले होते. पसार झालेल्या काळे याला काही महिन्यानंतर शहर पोलिस ठाण्याच्या पथकाने रेल्वेस्थानकातून अटक केली होती. 
 
चोरीचा मोबाइल हस्तगत करून सोडून दिले 
संशयिताला अटककेली नव्हती. त्याच्याकडून चोरीचा मोबाइल हस्तगत केल्यानंतर पुन्हा सोडून देण्यात आले आहे.
- प्रवीण वाडिले, पोलिस निरीक्षक 
बातम्या आणखी आहेत...