आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैसे लांबवणा-या महिला जालन्याच्या, ट्रॅव्हल्स, रिक्षामध्ये जुलैला चोरी केल्याची दिली कबुली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - ट्रॅव्हल्स रिक्षातून प्रवाशांच्या पिशवीतून पर्स लाबवणा-या तिघी महिलांना शुक्रवारी एमआयडीसी पोलिसांनी अटक केली होती. या तिघी महिला जालना येथील रहिवासी असून त्यांनी जुलैच्या शहरात दोन ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली आहे. तसेच त्यांनी २२ हजार रुपयांची रोकड पोलिसांना काढून दिली आहे.

कंडारी येथील दांपत्याचे ट्रॅव्हल्समध्ये प्रवास करताना २१ हजार आणि आदर्शनगरातील मकरा पार्कमधील सासू-सुनेचे रिक्षातून ४३ हजार ८०० रुपये चोरी झाले होते. या दोन्ही घटनांमध्ये तीन महिला एक लहान मुलगा असल्यामुळे त्यांच्याच टोळीने या दोन्ही घटनांत पैसे लांबवल्याचा पोलिसांना संशय होता. त्यादृष्टीने पोलिस महिलांचा शोध घेत होते. शुक्रवारी सायंकाळी वाजता तीन महिला दोन लहान मुलांसह संशयीतरीत्या फिरत असल्याची माहिती गस्तीवर असलेल्या एमआयडीसी ठाण्याचे कर्मचारी विजय पाटील आणि नीलेश भावसार यांना मिळाली होती. त्यावरून दोघांनी डी मार्टजवळ संशयीतरीत्या फिरणा-या या महिलांना ताब्यात घेतले होते.

२२ हजार हस्तगत
चोरीप्रकरणी एमआयडीसी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी ओळख परेडसाठी फिर्यादींना बोलावले होते. फिर्यादींनीही त्यांना ओळखले आहे. तसेच पोलिसांनी त्यांच्याकडून २२ हजार रुपये हस्तगत केले आहे.

महिलांना कोठडी
तिन्ही महिलांना शनिवारी न्यायाधीश ए.डी.बोस यांच्या न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. सरकारपक्षातर्फे अॅड.राजेश गवई यांनी तर आरोपीतर्फे अॅड.अजय शिसोदिया यांनी काम पाहिले.

भाषा कळत नसल्याचा बनाव
पोलिसांच्यापथकाने ज्योती राजू शिंदे (वय २५), अिनता रामू साकरे (वय २७) आणि पूजा सागर शिंदे (वय ३०) यांना शुक्रवारी ताब्यात घेतले होते. चौकशीदरम्यान सुरुवातीला तिघींनी पोलिस काय विचारतात ते समजत नसल्याचा बनाव केला. त्या आपसात तेलगू बोलत असल्याने पोलिसांनी दुभाजक बोलावण्याचे ठरवले. मात्र, पोलिसांनी खाक्या दाखवताच या महिला हिंदीतून बोलू लागल्या. त्या महिला मूळच्या आंध्र प्रदेशातील असून मांग- गारुडी समाजाच्या आहेत. पण सध्या त्या कुटुंबासहित जालना ये‌थील अंबड रस्त्यावर वास्तव्याला आल्या असल्याचे तसेच जुलैला शहरात दोन ठिकाणी चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली.

नागरिकांनीसतर्क राहावे
प्रवासादरम्यानतसेच रस्त्याने जाताना कुणी आपल्याला बोलण्यात अडकवून आपल्या मौल्यवान वस्तू साहित्य लांबवल्याच्या घटना नेहमी घडत असतात. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. तसेच असे चोरटे कुठे आढळले तर त्यांच्याविषयी पोलिसांना त्वरित माहिती द्यावी.
बातम्या आणखी आहेत...