आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमिष दाखवून लुटणारा ठग पोलिसांच्या जाळ्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - काहींना शासकीय नोकर असल्याची तर काहींना माजी आमदाराचा स्वीयसहायक असल्याची बतावणी करून आमिष दाखवून लुबाडणाऱ्या ठगाला जिल्हापेठ पोलिसांनी बुधवारी रात्री वाजता अटक केली. त्याने अनेकांना लुबाडल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.
पाळधी येथील विमल नथ्थू सुरवाडे (वय ६५) या वृद्धेला दगडू पंढरीनाथ चौधरी (वय ४६, रा.बोरखेडा, ता.धरणगाव) याने पेन्शन वाढवून देतो, म्हणून २१ सप्टेंबर रोजी चार हजार ९०० रुपये घेतले. याप्रकरणी सुरवाडे यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्याम तरवाडकर यांनी दिलीप पाटील, भटू नेरकर, राजेंद्र मेंढे, रवी नरवाडे, अल्ताफ पठाण, जगन सोनवणे यांचे पथक तपासासाठी पाठवले. त्यांनी बी.जे. मार्केटमध्ये बुधवारी रात्री वाजता चौधरी याला अटक केली.
सीसीटीव्हीमुळे सापडला ठग
दीडमहिन्यापूर्वी अशाच पद्धतीने पैसे लुबाडल्याची घटना घडली होती. त्या वेळी जिल्हापेठ पोलिसांनी बी.जे. मार्केटमधील चहाच्या दुकानावर लावलेल्या सीसीटीव्हीतून फुटेज मिळवले होते. पाळधी येथील सुरवाडे यांना त्याने नावही चुकीचे सांगितले होते. तसेच त्याने जिल्हा परिषदेत नोकरीला असल्याचे सांगितले होते. पोलिसांना शंका आल्याने त्यांनी सीसीटीव्हीचे फुटेज मिळवून त्याचा फोटो काढला. तो सुरवाडे यांना दाखवल्यानंतर तोच असल्याचे समोर आले. दरम्यान, चौधरी याला बुधवारी भेटण्यासाठी बोलावले. त्या वेळी बी.जे. मार्केटमध्ये पोलिसांनी सापळा रचून त्याला रात्री वाजता ताब्यात घेतले.
अनेकांनालुबाडले : जिल्हासामान्य रुग्णालयात नोकरीला आहे, जिल्हा परिषदेत नोकरीला आहे. तसेच माजी आमदार जगदीश वळवी यांचा स्वीय सहायक असल्याचे सांगून अनेकांना चौधरी याने आजपर्यंत लुबाडले. सिव्हिलमध्ये रक्त मिळवून देतो, म्हणून दोन ते तीन हजार रुपये घेऊन पसार होणे. नोकरीचे आमिष देऊन फसवणूक करणे, असे अनेक प्रकार चौधरी याने केले आहेत. पोलिसांच्या चौकशीत त्याने सहा जणांना फसवल्याची कबुली दिली आहे.
कोण आहे हा ठग ?
अनेकांनालुबाडणारा दगडू चौधरी हा ठग नेमका कोण आहे? असा प्रश्न सर्वांनाच पडतोय. चौधरी हा चोपड्याचे माजी आमदार वळवी यांचे मुंबई आणि जळगावात वैद्यकीय कामे बघत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याचाच फायदा घेऊन त्याने अनेकांना लुबाडले. मात्र, कोणीही तक्रार दिली नसल्याने तो आजपर्यंत मोकाट होता.