आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरटे शहरात मुक्कामी; सलग दुसऱ्या दिवशी चोरट्यांनी घातला धुमाकूळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - शहरातील सोमेश्वरनगरात चोरट्यांनी दोन बंद घरांचा कडी-कोयंडा रविवारी रात्री तोडला होता. त्यानंतर चोरट्यांनी सोमवारी रात्री आपला मोर्चा महामार्गालगतच्या सुंदरनगरकडे वळवला. सोमवारी एकाच रात्री चोरट्यांनी सुंदरनगरातील पाच घरांचे कडी-काेयंडे ताेडले. चार घरांमध्ये चोरट्यांच्या हाती काहीही लागले नाही. मात्र, एका घरातून १५ तोळे वजनाचे सुमारे लाख ३० हजार रुपयांचे दागिने चोरट्यांच्या हाती लागले.

शहरातील १५ बंगला भागाच्या पुढे राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या सुंदरनगरात साेमवारी रात्री चाेरट्यांनी धुमाकूळ घातला. सुंदरनगर भागातील बंद घरांना चोरट्यांनी टार्गेट केले. सुंदरनगरातील रहिवासी सरिता तरुण वर्मा यांच्या घरातून चोरट्यांनी १५ तोळ्यांचे दागिने लांबवले. सरिता वर्मा पुणे येथे गेल्या होत्या. मंगळवारी सकाळी त्या घरी परतल्यानंतर चोरीची घटना उघडकीस आली. चोरट्यांनी कपाटातील वस्तू अस्ताव्यस्त फेकल्या दागिने घेऊन चोरटे पसार झाले.

यांची घरे फोडली : साेमवारी रात्री चाेरट्यांनी सुंदरनगरातील रहिवासी सरिता वर्मा यांच्यासह सुरेंद्र माेरे, किरण अढाइंगे, पंकज हिवरे राजपूत यांच्या घरांची कुलुपे ताेडली. सर्व घरांचे मालक बाहेरगावी गेल्याने त्यांची घरे बंद होती. वर्मा यांच्याव्यतिरिक्त अन्य चार जणांच्या घरातून ऐवज चोरीला गेला नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात अाले.

दुसऱ्यादिवशी चोरी : रविवारी रात्री शहर पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील साेमेश्वरनगर साेपान कॉलनी परिसरातील दोन बंद घरांचे कडी-कोयंडे चोरट्यांनी तोडले होते. मात्र, दोन्ही घरांमध्ये चोरट्यांच्या हाती काहीही लागले नाही. या घटनेची पोलिसांत नोंद झालेली नाही. रविवारी रात्री ही घटना घडल्यानंतर साेमवारी रात्री सुंदरनगर भागात चोरी झाल्याचे समाेर अाले.
चाेरट्यांच्या तपासासाठीविशेष पथक नियुक्त केले जाईल. तसेच पाेलिसांच्या यादीवरील गुन्हेगारांची कसून चाैकशी केली जात अाहे. पोलिस लवकरच अाराेपींपर्यंत पोहोचतील. त्यादृष्टीने तपासाला गती दिली असून, मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. राेहिदास पवार, डीवाएसपी,भुसावळ

श्वान पथकाला केले पाचारण : चाेरीची माहिती मिळतात डीवायएसपी राेहिदास पवार बाजारपेठचे पोलिस निरीक्षक चंद्रकांत सराेदे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तसेच जळगाव येथून श्वान पथक ठसेतज्ज्ञांना घटनास्थळी पाचारण करण्यात अाले हाेते. श्वान पथकातील गाैरी श्वानाने कंटेनर डेपाेपर्यंत मार्ग दाखवला.