आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंद घरात तीन दिवस मुक्काम करून चाेरांनी लांबवला ९० हजारांचा एेवज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - चाेरट्यांवर पाेलिसाचा वचक नसल्याने ते बिनधास्त झाले. वाघनगर परिसरातील जिजाऊनगरातील एका बंद घरात चाेरट्यांनी ते सप्टेंबर असा तीन दिवस मुक्काम ठाेकून चाेरीचे व्यवस्थित नियाेजन केले. घरात बसून फ्रीजमधील खाद्यपदार्थांवर ताव मारत दारूदेखील रिचवली. विशेष म्हणजे घरात चाेर अाहे, याविषयी शेजारच्यांना साधी कुणकुणही लागू देता ते मालकासारखे घरात राहिले. त्यानंतर तिसऱ्या दिवशी घरातील अडीच ताेळे वजनाचा नेकलेस काही साहित्य अाणि हजार रुपये राेख असा सुमारे ९० हजारांचा एेवज लंपास करत धूम ठाेकली.
जिजाऊनगरातील पूजा टेंट हाऊसचे संचालक अनिल शिवदास राजे हे सप्टेंबरला नाशिकला त्यांच्या मुलाला भेटण्यासाठी गेले हाेते. त्यानंतर त्यांची अाई उषाबाई शिवदास राजे अाणि पत्नी वर्षा अनिल राजे या सप्टेंबरला पाचाेरा येथे अनिल यांच्या भावाचा अपघात झाल्याने त्यांना बघण्यासाठी गेल्या होत्या. त्या दोन्ही सप्टेंबरला सायंकाळी ७.३० वाजता घरी परत अाल्यानंतर त्यांना घराचे कुलूप तुटलेले दिसले. त्यामुळे त्यांनी घरात जाऊन पाहिले तर लाेखंडी कपाट फाेडलेले, काॅटमधील साहित्य अस्ताव्यस्त फेकलेले, वरच्या मजल्यावरील लाकडी कपाटाचे कुलूप ताेडलेले त्यांना दिसले.

चाेरट्यांनी कपाटातील अडीच ताेळे वजनाचा नेकलेस, हजार रुपये राेख, पितळाची भांडी, शिलाई मशीन अाणि मंडप बांधण्यासाठी लागणाऱ्या २० लाेखंडी पहार चोरट्यांनी लंपास केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे घरातील ही परिस्थिती पाहून त्या घाबरल्या. त्यांनी स्वत:ला सावरत तत्काळ घरात चाेरी झाल्याबाबतची माहिती अनिल राजे यांना फाेनवरून माहिती दिली.

गुन्हा दाखलचे आदेश
दरम्यान,याप्रकरणी तक्रार देऊनही पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. अखेर पोलिस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांनी डीवायएसपी सचिन सांगळे यांना गुन्हा दाखल करून घेण्याचे आदेश दिले. तसेच गुन्हा दाखल करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी करुन कारवाई करण्याचीही सूचना दिली.

घरात बसून रिचवली दारू
तीन दिवस घरात काेणाचा तरी वावर असल्याचे काॅलनीतील नागरिकांनी सांगितले. कारण रात्रीच्या वेळी घराचे दिवे सुरू हाेते. मात्र, राजे कुटुंबीय परत अाले असावे, म्हणून नागरिकांनी या गाेष्टीकडे दुर्लक्ष केले. चाेरट्यांनी घरात बिनधास्तपणे दारू पिऊन रिकाम्या बाटल्या ग्लास घरात पडू दिले. तसेच फ्रीजमधील खाद्यपदार्थही चाेरट्यांनी फस्त केले.

१५ दिवसांपूर्वी दाेघांना हटकले
राजे यांच्या घरासमाेर १५ दिवसांपूर्वी दाेन तरुण संशयितरीत्या फिरताना अाढळले हाेते. त्या वेळी वर्षा राजे यांनी त्यांना हटकले. त्यानंतर दाेघे त्या ठिकाणाहून निघून गेले होते. त्यांनी चाेरी केल्याचा संशय व्यक्त होत अाहे.

कारने अाले चाेरटे
राजेयांच्या अाई अाणि पत्नी सप्टेंबरला गावाला गेल्यानंतर त्यांच्या घरमालकाने तारखेला घराचे कुलूप व्यवस्थित असल्याचे बघितले. सप्टेंबरला राजे यांच्या मालकीची पांढऱ्या रंगाची टाटा नॅनाे कारसारखीच दुसरी राजे यांच्या कारच्या मागे उभी हाेती. ही कार राजे यांनी विकत घेतली असावी, असा अंदाज नागरिकांनी लावला. परंतु, ती कार चाेरट्यांची हाेती. सप्टेंबरपर्यंत ही कार उभी हाेती. दुपारनंतर मात्र ती गायब झाली. याप्रकरणी राजे यांच्या पत्नीने तालुका पाेलिस ठाण्यात चाेरीचा गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार दिली. परंतु पोलिसांनी सोमवारपर्यंत याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल केला नाही.
बातम्या आणखी आहेत...