आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरमालक झाेपेत; चाेरट्यांनी लांबवला ५८ हजारांचा एेवज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - गणेश काॅलनीतील युनिटी चेंबर्समधील फ्लॅटमध्ये रविवारी रात्री मालक झाेपलेले असताना चाेरट्यांनी चाेरी केली. त्यात त्यांनी ५८ हजार ४९८ रुपयांचा मुद्देमाल लंपास केला अाहे. हा फ्लॅट रावेरच्या माजी अामदारांच्या शालकाचे अाहे.

युनिटी चेंबर्समधील फ्लॅटमध्ये रावेरचे माजी अामदार शिरीष चाैधरी यांचे शालक ज्ञानेश्वर सुदाम बढे राहतात. त्यांचा इन्व्हर्टर, बॅटरी गुंतवणुकीचा व्यवसाय अाहे. रविवारी बढे यांच्या घरी त्यांची रावेर येथील बहीण गीता चाैधरी अालेल्या हाेत्या. त्यांनी रात्री १२.३० वाजेपर्यंत गप्पा मारल्या. त्यानंतर बढे, त्यांची पत्नी डाॅ.तृप्ती बढे, दाेन्ही मुले बहीण गीता हे सर्व जण झाेपी गेले. त्यानंतर रात्री ते पहाटे वाजेदरम्यान घराबाहेर ठेवलेल्या पाण्याच्या टाकीवर चढून चाेरटे फ्लॅटच्या गॅलरीत अाले. किचनचा अर्धवट लावलेला दरवाजा उघडून ते घरात घुसले. कपाटाच्या कडीला टांगलेली गीता चाैधरी यांची पर्स चाेरट्यांनी लांबवली. त्यात १५ हजार राेख हाेते. बढे यांच्या पाकिटातून ३५०० रुपये, ३९९९८ रुपयांचे नाेकिया कंपनीचे तीन, सॅमसंग कंपनीचा एक इन्टेक्स कंपनीचा एक असे पाच माेबाइल मिळून ५८४९८ रुपयांचा मुद्देमाल चाेरट्यांनी लांबवला. यानंतर चोरट्यांनी पर्स घरामागील उकिरड्यावर फेकून दिली. याप्रकरणी जिल्हापेठ ठाण्यात नाेंद केली असून, भटू नेरकर तपास करत अाहेत.


शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढतेय
शहरातीलकायदा-सुव्यवस्थेचे पूर्णत: बारा वाजलेले अाहेत. बाजारपेठेत िकरकाेळ कारणावरून झालेल्या हाणामाऱ्या, जबरी चाेऱ्या, घरफाेड्या अादी प्रकार वाढत चालले अाहेत. त्यामुळे शहरात माेठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढत असून, जिल्हा पाेलिस प्रशासनाने त्यावर वेळीच उपाययाेजना करण्याची गरज निर्माण झाली अाहे.

१० दिवसांत अपार्टमेंटमध्ये चाेऱ्या
शहरातगेल्या काही दिवसांपासून चाेरट्यांनी धुमाकूळ घातला असून, सध्या त्यांनी चाेरीसाठी अपार्टमेंट‌्सला लक्ष्य केले अाहे. २१ जून राेजी चाेरट्यांनी प्रेमनगरातील पद्मालय अपार्टमेंटमधील राजेंद्र कुमट यांच्या घरातून २० हजारांचा एेवज शिव काॅलनीतील साई अपार्टमेंटमधील िवनाेद चाैधरी यांच्या फ्लॅटमधून ७५ हजारांचा एेवज लंपास केला हाेता. तसेच २७ जूनला पालकमंत्री एकनाथ खडसे यांच्या बंगल्याजवळील श्रुती अपार्टमेंटमध्ये दाेन, वासंती अपार्टमेंटमध्ये एक अाणि सत्यवल्लभनगरातील साई हाइट्समधील रमेश भंगाळे यांच्या फ्लॅटमध्ये चाेरी करण्याचा प्रयत्न केला हाेता. तरीदेखील पाेलिस प्रशासनाचा सुस्त कारभार सुरू असल्याने नाराजी व्यक्त केली जात अाहे.

पाेलिसांची रात्रीची गस्त सुरू करण्याची मागणी
चाेरटेमुख्य रस्त्यांवरील अपार्टमेंटमध्ये चाेऱ्या करत अाहेत. मात्र, त्यापैकी बाेटावर माेजण्याइतक्याच चाेऱ्यांचा तपास लावण्यात पाेलिसांना यश अाले अाहे. शहरात रात्री गस्तच घातल्या जात नसल्याने चाेरट्यांचे फावते. याशिवाय १७ पाेलिस चाैक्यांपैकी एक-दाेन साेडल्या तर बाकी नेहमीच बंद असतात. त्या त्वरित सुरू करण्याची रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी हाेत अाहे.
बातम्या आणखी आहेत...