आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गिरणा टाकीजवळ पुन्हा सोनसाखळी लांबवली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शहरात सोनसाखळी चोरीची मालिका रविवारीदेखील सुरू होती. हरिविठ्ठलनगरातील एक महिला घरकाम करून घरी जात होती. दुपारी वाजता गिरणा पाण्याच्या टाकीजवळ दोन तरुण मोटारसायकलीवर आले. त्यांनी महिलेची ग्रॅम वजनाची १५ हजार रुपये किमतीची सोनसाखळी ओरबाडून नेली. शहरात गेल्या सहा दिवसांत चोरट्यांनी सहा घटनांमध्ये ९० ग्रॅम वजनाच्या लाख ३५ हजारांच्या सोनसाखळ्या लांबवल्या आहेत. हरिविठ्ठलनगरातील घरकाम करणाऱ्या सुनंदा राजेंद्र ठाकूर (वय ४२) या रविवारी दुपारी वाजता काम करून घरी जात होत्या. गिरणा पाण्याच्या टाकीलगतच्या सेंट जोसेफ स्कूलजवळ त्यांच्या समोरून हीरो पॅशन प्रो गाडीवर दोन तरुण आले.
त्यातील एका तरुणाने सुनंदा ठाकूर यांच्या गळ्यातील सोनसाखळी ओढली. त्यांनी आरडा-ओरड केली; मात्र चोरटे सुसाट वेगाने निघून गेले. दोन्ही तरुण २० ते २५ वयोगटातील होते. पुढच्याने तरुणाने गॉगल लावला होता. तर मागे बसलेल्या तरुणाच्या पाठीवर काळ्या रंगाची बॅग टांगलेली होती.

गेल्या महिनाभरा पासून सोनसाखळ्या चोरी करून महिलावर्ग तसेच पोलिसांचीही झोप उडवणाऱ्या चोरट्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी दिल्ली येथील एका महिलेस पोलिसांनी अटक केली असून ही महिला आपल्या मुलांकडून चोऱ्या करवून घेत होती. या महिलेचे जळगावात माहेर आहे. तिचे दोन दिवटे चिरंजीव पल्सर गाडीवर बसून सोनसाखळ्या लंपास करीत होते. या महिलेकडून सुमारे पावणेपाच लाख किमतीचे १८ तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी महिलेस अटक केली; मात्र तिचे दिवटे चिरंजीव पळून जाण्यात यशस्वी ठरले. सोनसाखळी चोरट्यांच्या टोळीचा छडा लागल्याने शहरातील तमाम महिलावर्गासाठी ही सुखद घटना ठरली आहे.

सततच्या चोऱ्यांमुळे, ‘सोनसाखळी चोरट्यांमुळे महिलांना रस्त्यावर फिरणे अवघड’ असे वृत्त ‘दिव्य मराठी’ने प्रकाशित केले होते. सोनसाखळी चोरट्यांमुळे पोलिसही वैतागले होते. या वृत्तानंतर शहरात ११ ऑगस्ट रोजी दोन ठिकाणी, १२ ऑगस्ट रोजी एक ठिकाणी आिण १४ ऑगस्ट रोजी दोन ठिकाणी सोनसाखळी चोरी झाल्या होत्या. यानंतरदेखील ‘दिव्य मराठी’ने या सर्व चोऱ्यांमध्ये चोरट्यांचे वर्णन आिण गाडी एकच असल्याबाबतही माहिती दिली होती. त्यानुसार पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली.

दोघांनी ओळखल्या सोनसाखळ्या : ११आॅगस्ट रोजी सोनसाखळी चोरी झालेल्या अपेक्षा अनिष जैन, मनीषा थत्ते यांना रविवारी पोलिसांनी बोलावले होते. त्यांनी सोनसाखळ्या ओळखल्या आहेत.
बिमलास २४ ऑगस्टपर्यंत कोठडी

तिघेचोरटे कंजरवाड्यात ये-जा करत असल्याची माहिती शनिवारी पोलिसांना मिळाल्यानंतर तपास केला असता, या वेळी त्यांनी कंजरवाड्यातील जाखनीनगरातून बिमलाला अटक केली; तर दोघे लॉजमध्ये असल्याने सापडले नाही. त्यांना आईला अटक केल्याची माहिती मिळाल्याने ते लॉजमधून फारार झाले. बिमलाने जयराम याच्या घरात लपवलेल्या सोनसाखळ्या, पाच मंगलपोत आिण ३१ मणी असा चार लाख ७७ हजार रुपये किमतीचे एकूण १७८ ग्रॅम वजनाचे दागिने, तिघांचे मतदान ओळखपत्र, १४ आॅगस्ट रोजी कर्नाटक एक्स्प्रेसचे परतीचे तिकीट आिण एक आयडीयाचे सिमकार्ड पोलिसांनी हस्तगत केले आहे. बिमलाला न्यायालयने २४ आॅगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांना असा लागला सुगावा
सोनसाखळीचोरटे १३ आॅगस्टला भुसावळच्या बजाज शोरूममध्ये त्यांची पल्सर (एमएच १९ बीवाय २२६१) दुचाकी घेऊन गेले. तेथे त्यांनी क्लच प्लेट बदलण्याबाबत विचारणा केली. या गोष्टीचा सुगावा स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी रवींद्र पाटील यांना लागला. त्यानुसार त्यांनी शोरूमच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेजमधील दोघे १४ आॅगस्टला बसस्थानकात चोरी करताना पार्सल आॅफिसच्या सीसीटीव्हीत कैद झालेले दोघे तेच आहे का? हे तपासले. दोघे तेच असल्याची खात्री झाल्यानंतर लगेच एलसीबी आिण एमआयडीसी पोलिसांनी कंजरवाड्यात काेम्बिंग आॅपरेशन राबवले. मात्र, त्यात दुसरेच गुन्हेगार सापडले.

संजय बनवारीलाल, लालसिंग रामसिंग आिण त्यांची आई सुनीतादेवी ऊर्फ मुन्नी बन्नेसिंग जालीमसिंग सासी ऊर्फ बिमला सुरज (रा.दिल्ली) हे आॅगस्ट रोजी दिल्ली येथून निघाले होते. ते अजमेर, अहमदाबाद, मीरा रोड (मुंबई), नाशिक या मार्गे १० आॅगस्टला रात्री जळगावात दाखल झाले होते. त्यांनी नाशिक येथून बजाज पल्सर गाडी विकत घेतली होती; तर जळगावात तिची पासिंग करून तिला एमएच-१९-बीवाय-२२६१ हा क्रमांक मिळाला होता. याच गाडीवर त्यांनी पाच ठिकाणी सोनसाखळ्या लांबवल्या होत्या. हे चोरटे रेल्वेस्थानक परिसरातील विसावा लाॅजवर दो दिवस तर दो दिवस गुरुकृपा लाॅजमध्ये थांबले होते. या महिलेचा चुलत भाऊ जळगावात राहतो. बिमलाचे माहेर कंजरवाड्यातील असल्याने तिचे तेथे येणे-जाणे होते. दोघे चोरटे दररोज चोरी करून गाडी कंजरवाड्यातील जयराम कंजर याच्या घरात झाकून ठेवत. चोरलेले दागिने बिमलाने जयराम कंजर याच्या बाथरूममध्ये पिशवीत लपवून ठेवले होते.

पोलिसांना १० हजारांचे बक्षीस
पोलिसअधीक्षक डाॅ.जालिंदर सुपेकर यांच्या आदेशानंतर एलसीबीचे निरीक्षक प्रभाकर रायते यांनी चोरट्यांचा शोध घेण्यासाठी एक टीम तयार केली. यात सहायक पोलिस निरीक्षक गणेश कदम, नीता मांडवे, मुरलीधर अमोदकर, नुरेद्दीन शेख, नीळकंठ पाटील, बापुराव भोसले, राजेंद्र पाटील, दिलीप येवले, रवींद्र घुगे, विनोद पाटील, रवींद्र गिरासे, विजय पाटील, मंगलसिंग पाटील, रवींद्र पाटील, रमेश चौधरी, विलास पाटील, शशिकांत पाटील, दीपक पाटील, संजय पाटील, जयंत चौधरी, रवींद्र चौधरी, विनायक पाटील, गफूर तडवी, नरेंद्र वारुळे, सुशील पाटील, महेश पाटील, प्रवीण हिवराळे, ललिता सोनवणे, गायत्री सोनवणे, वहदिा तडवी, मीनल साखळीकर, अलका मराठे यांचा समावेश होता. या टीमला पोलिस अधीक्षकांनी जाहीर केलेले १० हजारांचे बक्षीस देण्यात येईल, असे अप्पर पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सांगितले.