आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Third Railway Track Proposal Between Bhusawal And Nagpur

भुसावळ-नागपूरदरम्यान तिसऱ्या रेल्वेमार्गाचा प्रस्ताव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - भुसावळ-जळगाव तिसऱ्या रेल्वेलाइनच्या कामास गती आली असतानाच आता भुसावळ-नागपूर या मार्गावरही तिसऱ्या लाइनचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. हा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. तीन वेगवेगळ्या टप्प्यात हे काम होणार असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.

भुसावळ ते नागपूर मार्गावरील रेल्वेगाड्यांची संख्या वाढल्याने वाहतुकीचा प्रश्न बिकट आहे. गाड्या आऊटरला थांबण्याचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर तिसरा मार्ग महत्त्वाचा ठरणार आहे. पुणे, मुंबईकडून नागपूरकडे जाणाऱ्या गाड्यांची संख्या जास्त आहे. म्हणून तिसरी रेल्वेलाइन प्रस्तावित आहे. रेल्वे मंत्रालयाकडे हा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. त्यास मंजुरी मिळाल्यावर पुढील प्रक्रिया सुरू हाेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. भुसावळ ते नागपूर मार्गावरील तिसऱ्या रेल्वेलाइनचे काम तीन टप्प्यात केले जाणार आहे. यात पहिल्या टप्प्यात भुसावळ ते बडनेरा मार्गावरील काम केले जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात बडनेरा ते वर्धा तिसऱ्या टप्प्यात वर्धा ते नागपूर असे काम हाेणार असल्याचे संकेत आहेत. भुसावळ-जळगाव या मार्गावरील तिसऱ्या लाइनचे काम पूर्ण झाल्यावर जळगाव ते इगतपुरी मार्गावरही तिसऱ्या रेल्वेलाइनचे काम होणार आहे. रेल्वे मंत्रालयाने जळगाव ते इगतपुरी या मार्गावरील वाढलेली वाहतूक लक्षात घेता या मार्गावर तिसरा रेल्वेमार्ग सुरू करण्याचे पाऊल उचलले आहे. मुंबईपर्यंत येत्या पाच वर्षांत तिसऱ्या रेल्वेमार्गाचे काम पूर्णत्वास येऊ शकते.

तीन टप्पे
>भुसावळ-बडनेरा
>बडनेरा-वर्धा
>वर्धा-नागपूर

जळगावपर्यंत चौथी लाइन
भुसावळ-जळगावया मार्गावर तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम आता अंतिम टप्प्यात असताना भविष्यात याच मार्गावर चौथ्या रेल्वेलाइनचे काम सुरू केले जाणार आहे. त्यामुळे वाहतूक अत्यंत माेकळी होणार आहे. रेल्वेचे ट्रॅफिक जाम होण्याचे प्रकार थांबण्यास मदत होईल.