आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभियांत्रिकीच्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना गेट परीक्षेची संधी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स संस्थेतर्फे घेण्यात येणाऱ्या गेट २०१६ या ऑनलाइन प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. अभियांत्रिकीच्या मास्टर ऑफ इंजिनिअरिंग (एमई) या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी असलेल्या या परीक्षेसाठी अभियांत्रिकी पदवीतील तृतीय वर्षातील (बीई) विद्यार्थ्यांना बसता येईल.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स संस्थेतर्फे दरवर्षी गेट प्रवेश परीक्षेचे आयोजन केले जाते. अभियांत्रिकीच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळवण्यासाठी गेट प्रवेश परीक्षा देणे अनिवार्य असते. गेट २०१६ या प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले असून, सप्टेंबरपासून विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. या परीक्षेसाठी खुल्या आणि ओबीसी गटातील विद्यार्थ्यांना १५०० रुपये शुल्क, तर एसटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ७५० रुपये, विद्यार्थिनींसाठीही ७५० रुपये शुल्क आहे. ३० जानेवारी ते फेब्रुवारी २०१६ दरम्यान असणाऱ्या शनिवार आणि रविवारी या ऑनलाइन प्रवेश परीक्षा होणार अाहेत. अधिक माहितीसाठी www.gate.iisc.ernet.in या संकेतस्थळ पाहावे.

विभागात ७८० जागा
मास्टरऑफ इंजिनिअरिंगच्या नाशिक विभागात २६ कॉलेज आहेत. त्यात विविध विद्या शाखांच्या मिळून ७८० जागा उपलब्ध आहेत. गेट उत्तीर्ण विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्राधान्याने प्रवेश दिला जातो.

१२हजार ५०० विद्यावेतन
अभियांत्रिकीतीलअंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना गेट परीक्षेसाठी बसता येणार अाहे. या ऑनलाइन प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना मास्टर ऑफ इंजिनिअरिंग अभ्यासक्रमासाठी प्राधान्याने प्रवेश दिला जातो. तसेच पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत असताना सरकारतर्फे प्रतिमहिना १२ हजार ५०० रुपये विद्यावेतन दिले जाते.

असे आहे वेळापत्रक
सप्टेंबरते ऑक्टोबर २०१५ ऑनलाइन प्रवेश अर्जाची मुदत
१७ डिसेंबर २०१५ प्रवेशपत्र उपलब्ध हाेईल.
३० जानेवारी ते फेब्रुवारी २०१६ दरम्यान शनिवार रविवारी परीक्षा हाेईल.
१९ मार्च २०१६ निकाल जाहीर हाेईल.
बातम्या आणखी आहेत...