आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • This Pond Condition I Can't See It Rajendra Singh

अरेरे.. तलावाची ही अवस्था माझ्याकडून पाहिली नाही जात - राजेंद्र सिंह

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - ‘अरेरे, एका तलावाची ही अवस्था माझ्याकडून पाहिली नाही जात.’ हे विधान आहे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांचे मेहरूण तलावाकाठचे. तलावाचे नैसर्गिक स्रोत अडविणार्‍यांविरुद्ध जनआंदोलन उभे राहायले हवे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.


जळगाव शहर महानगरपालिकेतर्फे येथील कांताई सभागृहात आयोजित पाणी परिषदेसाठी राजेंद्र सिंह आज मंगळवारी शहरात आले होते. परिषदेचं पहिल्या दिवसाचं कामकाज संपल्यानंतर त्यांनी थेट मेहरूण तलाव गाठला. त्याची सध्याची दुरवस्था पाहून ते अक्षरश: हळहळले.


‘ऐसा सुखा तालाब मुझसे देखा नही जाता’, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. हा सुरेख तलाव कोरडा कसा झाला? असा प्रश्‍न त्यांनी त्यांच्यासोबत असलेल्या महापौरांना विचारला. वाढलेला गाळ आणि कमी झालेले स्रोत यामुळे मेहरूण तलावाची अशी अवस्था झाली असावी, असे मत महापौर किशोर पाटील यांनी व्यक्त केले. त्यावर तलावाकडे पाणी वाहून आणणारे नैसर्गिक स्रोत अडवले गेले असतील आणि त्यामुळेच तलावात पाणी आले नाही, असे ते म्हणाले.
तलावाच्या नैसर्गिक स्रोतांकडे लक्ष द्या. ते अडविले गेले आहेत का, हे शोधा अशी सूचना महापौरांना करीत त्यांनी या प्रकरणात कायद्याचाही आधार घेण्याचा सल्ला महापौरांना दिला. तलावाचं शहरासाठी असलेलं महत्त्व लक्षात घेता त्याचे स्रोत अडविले गेले असतील तर त्याविरुद्ध जनआंदोलन उभे राहायला हवे, जळगावकरांनी त्यासाठी तातडीने पाऊल टाकले पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.