आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • This Year Tenth, Twelfth Board Examination Going On Old Rules

दहावी, बारावीची परीक्षा यंदा जुन्याच नियमानुसार हाेणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - प्रात्यक्षिक परीक्षेतील गुणांमुळे इयत्ता दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण वाढते. मात्र, निकालासोबत गुणवत्ताही वाढावी यासाठी लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षेतही विद्यार्थी स्वतंत्रपणे उत्तीर्ण व्हावेत, यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला होता. परंतु, त्यावर काहीच निर्णय झाल्यामुळे यंदा जुन्या नियमानुसारच परीक्षा होणार आहे.

इयत्ता दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची लेखी आणि तोंडी तसेच प्रात्यक्षिक परीक्षा घेतली जाते. या परीक्षांचे गुण एकत्रित करून निकाल जाहीर केला जातो. मात्र, या पद्धतीत प्रात्यक्षिक परीक्षेचे २० आणि लेखी परीक्षेत अवघे १५ गुण मिळवून विद्यार्थी उत्तीर्ण होत होते. या नियमामुळे उत्तीर्णतेची टक्केवारी वाढली, तरी गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत होते. त्यामुळेच विद्यार्थ्यांच्या लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षेचे गुण एकत्रित करता विद्यार्थ्यांनी दोन्ही परीक्षांत स्वतंत्रपणे उत्तीर्ण व्हावे, अशी तरतूद असणारा प्रस्ताव दिला होता. मात्र, या प्रस्तावाबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे यंदा जुन्या नियमाप्रमाणेच परीक्षा होणार असून सर्व गुण मिळून ३५ टक्के मिळाले म्हणजे पास, असेच गृहीत धरले जाणार आहे. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची तोंडी, लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षा शाळा आणि कॉलेजस्तरावर घेतली जाते; परंतु निकाल वाढावा यासह मुलांचे नुकसान नको, या सबबीखाली या पद्धतीत मोकळ्या मनाने गुण दिले जातात, असा आरोप केला जात होता. त्यामुळे प्रात्यक्षिक परीक्षांसाठी बहिस्थ परीक्षक नेमण्याचा निर्णय घेतला; परंतु मर्जीतील विद्यार्थ्यांना गुण देण्याचे गैरप्रकार समोर आले होते. २० टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळाले तरी तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षेतील गुणांमुळे विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकालाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे सेपरेट पासिंगचा प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र, नव्या शैक्षणिक वर्षातील परीक्षेमध्ये कोणती पद्धत लागू असेल यावर निर्णय झाल्याने यंदा सेपरेट पासिंगऐवजी जुन्याच पद्धतीनुसार ३५ टक्के गुण मिळाले तरी ते विद्यार्थी उत्तीर्ण होणार आहेत.

प्रात्यक्षिकातील गुणांचा विद्यार्थ्यांना फायदा
लेखीपरीक्षेसहतोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षाही होते. यातील गुण एकत्र करून निकाल जाहीर केला जातो. परंतु, प्रात्यक्षिक परीक्षेत १८ ते २० गुण सहज मिळत असल्याने लेखी परीक्षेत १५ गुण मिळाले तरी विद्यार्थी उत्तीर्ण होतात. याऐवजी लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षेचे गुण स्वतंत्रपणे नोंदवावे आणि दोन्ही परीक्षांत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करावे, असा प्रस्ताव होता.