आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खडसे यांना फेसबुकवरून जिवे मारण्याची धमकी, संबंधिताच्या अटकेसाठी आंदोलन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना फेसबुकवरून जिवे मारण्याची धमकी देण्यात अाल्याचे साेमवारी उघडकीस अाले. या संदर्भात गुन्हा दाखल करून संबंधितांना तत्काळ अटक करावी, या मागणीसाठी भाजपच्या अामदारांसह पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी साेमवारी रात्री पाेलिस अधीक्षक कार्यालयात अांदाेलन केले. दाेषींना अटक न केल्यास तीव्र अांदाेलनाचा इशारा अामदार सुरेश भाेळे यांनी दिला. दरम्यान, या प्रकरणाचा सायबर सेलकडून तपास सुरू अाहे. कायदेशीर प्रक्रिया बघून पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती अपर पाेलिस अधीक्षक नंदकमार ठाकूर यांनी दिली.

अनंत पाटील अाणि सुनील पाटील या नावाच्या फेसबुक अकाउंटवरून ही धमकी असलेली पाेस्ट फैजपूर येथील भरत महाजन यांच्या अकाउंटवर टाकण्यात अाल्याचे समाेर अाले अाहे.