आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खडसे यांना अफ्रिकेतून माेबाईलवर धमकी; चौकशीची मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे व त्यांच्या दाेन सुरक्षारक्षक असलेल्या पोलिस शिपायांना मोबाईलवर धमकावण्याचा प्रकार समोर आला आहे. यासंदर्भात जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्र कराळे यांच्याकडे खडसे यांनी तीन वेगवेगळी पत्र देऊन चौकशीची मागणी केली आहे. १६ अाॅक्टाेबर राेजी पहाटे खडसे यांच्यासह त्यांच्या दाेन्ही अंगरक्षकांच्या माेबाईलवर महिलेच्या अावाजात संभाल के रहाे! असा इशारा देण्यात अाला. साेमवारी पहाटे ५.४० वाजता ००२५७७१०४३७७१ या क्रमांकावरून अामदार खडसे यांना फाेन आला. त्यानंतर सकाळी ६.२० ला रक्षक गणेश पाटील यांच्या मोबाइलवर ००२५७७१०५१८०३  या क्रमांकावरून फाेन आला. यानंतर  सकाळी १० वाजता दुसरे अंगरक्षक तुषार मिस्तरी यांच्या मोबाइलवर ००२५७७१०५६७६० या क्रमांकावरून धकमीचा फाेन आला. या तिनही कॉलवर महिलेच्या आवाजात  संभाल के रहो ! हेच दोन वेळा सांगण्यात आले.  चाैकशीध्ये ००२५७ हा कोड बुरुंडी पूर्व आफ्रिकेतील छोट्या देशाचा असल्याचे स्पष्ट झाले. रवांडा, टांझानिया व काँगोचे या देशांला लागून असलेल्या बुरुंडी या देशातून खडसेंना फाेन येण्याचे कारण नसल्यामुळे फाेनसंदर्भात त्यांनी पाेलिसांत तक्रार दिली आहे.
बातम्या आणखी आहेत...