आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावमध्‍ये तिघा आरोपींना पोलिस कोठडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- मेहरूण परिसरातील रामेश्वर कॉलनी येथील मंगल गणेश पाटील (वय 38) याच्या खून प्रकरणातील संशयित आरोपी समाधान पाटील, मनोज भंगाळे (दोघे रा.रामेश्वर कॉलनी) आणि अनिल केदार (रा. खेडी) यांना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने तिघांना 12 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

तिघांनी पाटील यांना मंगळवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास चारचाकी वाहनात घेऊन गाडीतच त्यांचा गळा आवळून खून केला होता. यानंतर पाटील यांचा मृतदेह शिरसोली रोडवरच फेकून दिला होता. बुधवारी रात्री 8 वाजता एमआयडीसी पोलिसांनी तिघांना अटक केली. गुरुवारी न्यायाधीश ए.डी.बोस यांच्या न्यायालयात हजर केले असता तिघांना 12 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. सरकारपक्षातर्फे अँड. एम.एस.फुलपगारे यांनी काम पाहिले.