आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुसावळच्या नगरसेवकाचे साडेतीन लाख लांबवले, गोलाणी मार्केट परिसरात उभ्या वाहनातून चोरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - गाेलाणी मार्केटच्या परिसरात उभी केलेल्या चारचाकी वाहनाची काच फाेडून भुसावळ येथील नगरसेवकाचे साडेतीन लाख रुपये लांबवल्याची घटना शुक्रवारी रात्री ७.३० वाजेच्या सुमारास घडली. 
 
अमाेल मनाेहर इंगळे हे भुसावळ येथे भाजपचे नगरसेवक अाहेत. ते शुक्रवारी सायंकाळी आपल्या खासगी कामानिमित्त गाेलाणी मार्केटमध्ये अाले हाेते. वाहन पार्किंगची समस्या असल्याने अग्निशमन कार्यालयाजवळ त्यांनी अापल्या मालकीची डिझायर कार (एमएच १९, बीडी ४१४१) उभी पार्किंग केली हाेती. या कारच्या मागील सीटवर कापडी पिशवीत त्यांनी लाख ५० हजार रुपये ठेवले हाेते. त्यांनी कारच्या काचा व्यवस्थित लावल्याची खात्रीही केली होती. मात्र, इंगळे हे गाेलाणी मार्केटमध्ये गेल्याची संधी साधून अज्ञात चाेरट्यांनी कारच्या डाव्या बाजूला असलेल्या मागील सीटची काच फाेडून पैसे घेऊन पाेबारा केला. दरम्यान, अमाेल इंगळे हे काम अाटाेपून कारजवळ परतल्यानंतर त्यांच्या हा प्रकार लक्षात अाला. या प्रकरणी शहर पाेलिस ठाण्यात चाेरीचा गुन्हा दाखल केला अाहे. 
बातम्या आणखी आहेत...