आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतातील बनावट दारूचा कारखाना उद‌्ध्वस्ता, तीन अाराेपी अटकेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - महामार्गावरील दारूचे दुकान बंद होताच आता मध्य प्रदेशातील दारू विक्रेत्यांनी जळगाव जिल्ह्यात बनावट दारू तयार करून विक्री करण्याचा धंदा सुरू केला आहे. चाळीसगाव बायपास रोडवर एका शेतात सुरू करण्यात आलेल्या या दारूच्या कारखान्यावर एलसीबीच्या पथकाने छापा मारला. यात १ लाख १० हजार रुपयांची देशी, विदेशी बनावट दारू जप्त केली असून तिघांना अटक करण्यात आली आहे.  
 
फिरोज खान अहमद खान (३०, रा.मुस्लिमपुरा, पहिली गल्ली, वॉर्ड नं. ५६, मालेगाव), नदीम खान शाबीर खान (२३, नागद रोड, चाळीसगाव) आणि शाहरुख शेख रफिक (२४, नागद रोड, चाळीसगाव) अशी अाराेपींची नावे अाहेत.  एकूण १ लाख ११ हजार ५३५ रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.    

मास्टरमाइंड फिरोज :  या टोळीचा मास्टरमाइंड फिरोज आहे.  मध्य प्रदेशातील पहाड पट्टीत दारू तयार केली जात असल्याचे त्याला माहीत होते. मध्य प्रदेशातील स्पिरिट (इसरा) हे अत्यंत कडक असल्यामुळे कमी खर्चात मोठ्या प्रमाणात दारू तयार करता येते. ५०० रुपयांत तयार झालेल्या बनावट दारूची किंमत बाजारात आल्यावर तीन हजार रुपयांपर्यंत होते, अशी माहितीही त्याने मिळवली.  कमी कष्टात जास्त पैसे कमावण्याच्या नादात फिराेजने नदीम व शाहरुख यांच्या मदतीने हा धंदा सुरू केला हाेता.  
 
जीवघेणे स्पिरिट: मध्य प्रदेशातील कडक स्पिरिट हे आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. याची मात्रा दारूत काही अंश जरी वाढली तरी त्यापासून तयार झालेली बनावट दारू पिणाऱ्याच्या जिवावर बेतू शकते. मध्य प्रदेशासह देशभरात अशा घटनांमध्ये अनेक जणांचे मृत्यू झालेले आहेत. अशा प्रकारे बनावट दारू म्हणजे एक प्रकारे विषच असल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.   

मध्य प्रदेशातून अाणले कडक स्पिरीट  
तिन्ही अाराेपींनी चाळीसगाव परिसरातच शेतात जागा निवडली. ठरल्याप्रमाणे फिरोजने मध्य प्रदेशातून ‘कडक स्पिरिट’ आणले. देशी, विदेशी दारूच्या रिकाम्या बाटल्या भंगारमधून खरेदी केल्या. त्या सीलबंद करण्यासाठी मशीनही खरेदी केली होती. दारू तयार करण्यासाठी लागणारे विविध फ्लेव्हरच्या बाटल्यांमधून दोन-दोन थेंब टाकताच स्पिरिट व पाण्याच्या मिश्रणाला संबंधित दारूचा गंध येतो. त्यामुळे पिणाऱ्यांना दारू बनावट असल्याची कल्पनाही येत नाही. तीन-चार दिवसांपूर्वीच त्यांनी येथे दारू तयार करणे सुरू केले होते. एलसीबीच्या पथकाला गुप्त माहिती मिळताच त्यांनी छापा मारून हा अड्डा उद्ध्वस्त केला. 
बातम्या आणखी आहेत...