आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन मुलांना सांभाळून ‘ती’ करतेय, ‘पाेस्टवुमन’ची नाेकरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - धरणगाव तालुक्यातील भाेलाणे येथील पाेस्टमास्तर साहेबराव तायडे यांचे पाच वर्षांपूर्वी कर्कराेगाने निधन झाले. त्यांच्या अचानक निधनाने कुटुंबात सगळेच अायुष्य थांबल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. त्या वेळी त्यांच्या पत्नी लक्ष्मी तायडे या खंबीरपणे उभ्या राहिल्या. तीन मुलांचा सांभाळ अापल्यालाच करायचा अाहे; त्यांचे मित्र, नातेवाईक, वडील अन अाईची भूमिकादेखील अापल्यालाच निभवावी लागेल, यासाठी त्यांनी पतीच्या जागेवर पाेस्टात रुजू हाेत ‘पाेस्टवुमनची’ नाेकरी स्वीकारली. त्यांच्या या निर्णयामुळे कुटुंबाची विस्कटलेली घडी अाता व्यवस्थित बसली अाहे. 
 
इयत्ता १०वी उत्तीर्ण असलेल्या लक्ष्मी तायडे यांनी स्वप्नातही विचार केला नव्हता की, त्यांना कधी नाेकरी करावी लागेल; पण पतीच्या निधनानंतर त्यांना नाेकरी करण्याशिवाय पर्याय नव्हता. तीन मुलांचा सांभाळ करण्यासाठी त्यांनी स्वयंप्रेरणेने पाेस्टात नाेकरी स्वीकारली. ‘पाेस्टवुमन’ची नाेकरी फिरस्तीची असते. यात राेज अनेक लाेकांना भेटणे, त्यांचे डाक व्यवस्थित देणे अशी अनेक कामे करावी लागतात. या सगळ्या गाेष्टींची पूर्वकल्पना त्यांना हाेती. शहरात फिरणे कठीण हाेते; पण ‘मी करेन...’ हा विचार त्यांनी मनात कायम ठेवला. त्यानुसार त्या गेल्या वर्षांपासून भाेलाणे येथून ये-जा करून जळगाव डाक विभागात सेवा बजावत अाहेत.
 
त्यांची दाेन मुले ही अाता १२वीमध्ये, तर मुलगी ९वीमध्ये शिक्षण घेत अाहे. दरराेज डाक विभागातून नवीन बसस्थानक, पत्रकार काॅलनी, देशपांडे मार्केट, राधाकृष्णवाडी, नवीन बी.जे.मार्केट, गांधीनगर या संपूर्ण परिसरात त्या डाक पाेहाेचवतात. सकाळी १० ते दुपारी वाजेदरम्यान सगळ्या ठिकाणी त्या पायीच जातात. डाक विभागात त्यांच्यासारख्याच अाणखी चार महिलादेखील खूप वर्षांपासून ‘पाेस्टवुमन’ची नाेकरी करीत अाहेत. 
 
घर अन‌् नाेकरीचा याेग्य ताळमेळ साधतेय 
मी मनाने खूप खंबीर अाहे. पतीच्या अाजारातही अाम्ही खूप उपचार केले; परंतु त्यांचा जीव वाचवू शकलाे नाहीत. जेव्हा अाधार जाताे तेव्हा अाभाळ काेसळते. लाेकांचा दृष्टिकाेन वेगळा हाेऊन जाताे. यामध्ये अापला स्वाभिमान, चारित्र्य जपणे अत्यंत महत्त्वाचे असते. हे संकट खूप भयानक असते. ते काेणावरच कधी येऊ नये, ही ईश्वराकडे प्रार्थना करते. कारण घर अाणि नाेकरीचा याेग्य ताळमेळ साधावा लागताे. खूप भयानक काळ हाेता ताे सगळा. अापल्याला जर एक अंग नसते तर काय केले असते? कसे झाले असते? असा विचार मनात अाल्यावर मी खूप सुखी असल्याचा भास नेहमी हाेताे.
 
बातम्या आणखी आहेत...