आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाडीचे टायर फुटल्याने तिघांचा मृत्यू; 3 गंभीर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - शिंदखेडा तालुक्यातील धमाणे गावाजवळ वाहनाचे टायर फुटून झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील तीन जण ठार झाले, तर तीन जण गंभीर अाहेत. मृत अमळनेर तालुक्यातील निंभाेरा गावातील रहिवासी अाहेत. ते नंदुरबार जिल्ह्यात घोटाणे येथे अंत्ययात्रेसाठी जात होते. जखमींना येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात अाले आहे. अमळनेर तालुक्यातील निंभाेरा येथील निंबा उदा धनगर यांचे सासरे दंगल छबा धनगर ( रा. घोटाणे, ता. नंदुरबार) यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या अंत्ययात्रेस निंभाेरा येथील धनगर कुटुंबीय जात होते. दोंडाईचा-शिंदखेडा रस्त्यावर धमाणे गावाजवळील वळणावर रविवारी दुपारी चार वाजता नंदुरबार तालुक्यातील घोटाणेकडे जाणाऱ्या अमळनेर तालुक्यातील निंभाेरा गावातील धनगर कुटुंबाच्या मॅक्स पिकअप वाहनाचे मागचे टायर फुटले. त्यामुळे वाहन उलटून झालेल्या अपघातात तीन जण ठार झाले. मृतात प्रकाश लोटन धनगर (वय ५०), हिरामण पीतांबर धनगर (वय ५०), जयश्री सुनील धनगर(२६) यांचा समावेश आहे. त्यातील एक जण घटनास्थळी ठार झाला. तर दोघांचे जिल्हा रुग्णालयात नेत असताना वाटेत निधन झाले. या अपघातात दिनेश भिवसन धनगर (५०), समाधान गोरख धनगर (१३), विष्णू नीलेश धनगर (२), वच्छला नागराज धनगर (५०), केशव धोंडू धनगर (५२), मंगला राजेंद्र धनगर(४०), उषा शिवाजी धनगर (४८), रेखाबाई मनोज धनगर (३०), श्रीराम सुभाष धनगर (५६), मल्हारराव निंबा धनगर (४९), मुरलीधर बुधा धनगर (१२), पूजा श्याम धनगर (२१), अरुणाबाई दिलीप धनगर (४०), श्याम निंबा धनगर (२८), दगूबाई उदा धनगर (९०), दिनेश अशोक धनगर (२८), निंबा उदा धनगर (६५), देवकाबाई आत्माराम धनगर (६९), विजूबाई रमेश धनगर(५५) हे सर्व जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच निंभाेऱ्याचे शेतकी संघाचे चेअरमन विजय पाटील, बाजार समितीचे संचालक पराग पाटील यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची चाैकशी केली.
बातम्या आणखी आहेत...