आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक येथील तिघांचा जळगावात अपघातात मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव : नाशिकहून जळगाव येथे अंत्यसंस्कारांसाठी कारने येणाऱ्या चाैघांपैकी तीन जणांचा जळगावात झालेल्या अपघातात अागीत हाेरपळून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास घडली. जळगावकडून धुळ्याकडे जाणाऱ्या कंटेनरचे टायर फुटल्याने कंटेनर अाडवा झाल्यानंतर हा अपघात झाला. जळगावातील हिरामण वामन विसपुते ( ८०) यांचे शनिवारी निधन झाले हाेते.
हा निराेप मिळाल्यानंतर विसपुते यांची नाशिक येथील पुतणी रजनी सुभाष भामरे (५५) व भामरे कुटुंबातील अन्य तीन जण विसपुते यांच्या अंत्यसंस्कार विधीसाठी नाशिक येथून कारने जळगावकडे येण्यासाठी निघाले. जळगावातील अाहुजानगरजवळ अाल्यानंतर जळगावकडून धुळ्याकडे जाणाऱ्या कंटेनरचे पुढील टायर फुटल्याने ते रस्त्यात अाडवे झाले.
या कंटेनरवर कार धडकली. या अपघातानंतर लगेच कारने पेट घेतल्याने कारमधील तिघांचा जळून मृत्यू झाला. त्यात रजनी भामरे व पंडित यादव दुसानेंसह कारचालकाचा समावेश अाहे. कारमधील एक जण बचावला. अपघातानंतर कंटेनरचालक पसार झाला.
बातम्या आणखी आहेत...