आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काेसळलेल्या डाेंगरातून मार्ग काढत तीन कुुटूंबे परतली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेपाळमध्ये मंडाेरे, मानुधने अाणि बियाणी परिवारातील हे सदस्य गेले होते.
जळगाव - नेपाळमधील तीर्थयात्रेसाठी गेलेल्या जळगावातील मंडाेरे, मानुधने अाणि बियाणी परिवारातील तब्बल २० सदस्य नेपाळहून भारतात सुखरूप परतले अाहेत. काठमांडूपासून ८० किलाेमीटर अंतरावर असताना भूकंपाचे धक्के जाणवल्याने त्यांना अर्ध्यातूनच परत यावे लागले. वाटेत काेसळलेले डाेंगर अाणि त्यामुळे झालेल्या वाहतूक काेंडीतून मार्ग काढत तिन्ही कुटंुबे बिहारमध्ये दाखल झाली अाहेत. येत्या मे राेजी ते सर्व जण जळगावात येणार असल्याचे त्यांच्यासाेबत असलेले लक्ष्मीनारायण मंडाेरे यांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना सांगितले.

जळगावातील रहिवासी असलेले लक्ष्मीनारायण मंडाेरे, महेश मानुधने अाणि सुभाष बियाणी यांच्या कुटंुबातील २० जण १५ एप्रिल राेजी दाेन क्रुझर गाड्यांमधून नेपाळला गेले हाेते. २४ एप्रिल राेजी ते नेपाळमधील जनकपुरी येथे पाेहाेचले. तेथे मुक्काम करून ते २५ राेजी काठमांडू अाणि पशुपतिनाथ येथे जाणार हाेते. मात्र, काठमांडूपासून ८० किलाेमीटर अंतरावर असतानाच भूकंपाचे धक्के जाणवू लागले. माेठ्या प्रमाणावर बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे रस्त्यालाही माेठमाेठे तडे पडले. तसेच अनेक िठकाणी डाेंगर काेसळल्याने मार्गावर वाहतुकीची काेंडी निर्माण झाली. त्यामुळे या सर्वांना रस्त्यातच थांबावे लागले.

माघारी जाण्याचा मिळाला सल्ला
भूकंपामुळेघाबरलेल्या प्रवाशांना धीर देत माघारी जाण्याचा सल्ला तेथील स्थानिक सैनिकांनी दिला. त्यामुळे डाेंगर काेसळल्याने झालेल्या वाहतूक काेंडीतून मार्ग काढत या सर्वांनी रविवारी सायंकाळी वाजता भारताच्या हद्दीत प्रवेश केला. साेमवारी ते बिहारमधील गया येथे पाेहाेचले. मेपर्यंत ते सर्व जण जळगावात पाेहाेचणार असल्याची माहिती मंडाेरे यांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना िदली.

प्रशासनानेसाधला पर्यटकांशी संपर्क
नेपाळमध्येगेलेल्या पर्यटकांचे माेबाइल क्रमांक मिळवून मंत्रालयातील नियंत्रण कक्षातून जळगावातील मंडाेरे कुटुंबीयांची माहिती मागवण्यात अाली. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने या पर्यटकांशी संपर्क साधला. सर्व प्रवासी सुखरूप असून, मे राेजी जळगावात येणार असल्याची माहिती राज्य शासनाला पाठवण्यात अाली अाहे.