आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Three People Arrested For Fake Brith Certificate

महापालिकेच्या बनावट जन्म दाखल्यांप्रकरणी तिघांवर गुन्हे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - महापालिकेतून दिल्या जाणाऱ्या जन्म दाखल्यावर अधिकाऱ्यांची खाेटी स्वाक्षरी करून हुबेहूब दिसणारे बनावट दस्तएेवज तयार केल्याचा प्रकार महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी मंगळवारी उघडकीस आणला. बनावट दाेन दाखले दुरुस्तीसाठी पालिकेत आले होते. त्यावरून हा प्रकार लक्षात आला. याप्रकरणी तीन जणांविरुद्ध शहर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी मनपा जन्म मृत्यु विभागाचे प्रमुख लेखापाल राजेंद्र पांडुरंग पाटील यांच्या दिलेल्या फिर्यादीवरून अजीज अहमद मुसाजी बोहरी, पवन विलास बोराणकर(रा. पाचोरा)व पाटील फुलवाला (रा. जळगाव) यांच्यावर रात्री उशिरा फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
पालिकेच्या जन्म दाखल्यांसारखे बनावट दस्तएेवज तयार करून नागरिकांना वितरित करण्याचा प्रकार सुरू अाहे. २६ फेब्रुवारी राेजी जन्म दाखल्यावर दुरुस्ती करून मिळण्यासाठी पाचाेरा येथून एक व्यक्ती महापालिकेत अाला हाेता. ताे दाखला बनावट असल्याचे निदर्शनास अाल्यानंतर संबंधिताला हा दाखला दुरुस्तीसाठी काेणी दिला? याची विचारणा केली असता, त्यांनीपाचाेरा येथील पासपाेर्ट एजन्टचे नाव सांगितले हाेते. विशेष म्हणजे १६ जानेवारी २०१६ राेजी वितरित करण्यात अालेल्या दाखल्यावर लिपिक, तपासणीस अाराेग्याधिकारी यांची करण्यात अालेली स्वाक्षरी ही बनावट अाहे. जे अधिकारी अाज त्या पदावर कार्यरत नाहीत, त्यांच्या नावाने ही स्वाक्षरी केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महापालिकेच्या नावाने बाेगस जन्म दाखले देणारी टाेळी जिल्ह्यात सक्रिय असल्याचा संशय पालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला अाहे.

जिल्ह्यात बनावट दाखले देणारे रॅकेट?
पालिकेच्या जन्म-मृत्यू नाेंदणी विभागात गेल्या १५ दिवसांत जन्माचे दाेन बाेगस दाखले दुरुस्तीसाठी अाल्याचे निदर्शनास अाले अाहे. यावरून यात पाचाेरा येथील एकाचा अर्ज हाेता, तर दुसरा जळगाव शहरातील मेहरूण भागातील असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली आहे. पाेलिस चाैकशीत बनावट दाखले तयार करून नागरिकांकडून पैसे उकळणारी टाेळी उघडकीस येण्याची शक्यता अाहे.