आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाेन दुचाकींची समाेरासमाेर धडक; जळगावातील अपघातात 3 जण ठार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चाेपडा- बऱ्हाणपूर-अंकलेश्वरमार्गावर चाेपडा ते अडावददरम्यान वडती फाट्याजवळ रविवारी रात्री ८.३० वाजता दाेन दुचाकींची समाेरासमाेर धडक झाली. त्यात जण ठार झाले. त्यापैकी दाेघे मृत हे माचल्याचे अाहेत. एकाची अाेळख पटलेली नाही. 

चाेपडा येथून काम अाटाेपून माचल्याचे दिनेश प्रल्हाद पाटील (वय ४२), केशरलाल धर्मा पाटील (वय ४०) हे दाेघे जण दुचाकीने घराकडे येत हाेते. त्यांच्या दुचाकीला (एम.एच. १८ एजी २८५०) समाेरून येणाऱ्या दुचाकीने (एम.एच. १९ सीएम ८८२६) धडक दिली. त्यात दाेघांचा दुसऱ्या दुचाकीवरील अज्ञात इसम अशा तिघांचा मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्या दाेघांवर डॉ. मनोज पाटील यांनी जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलवले. अपघात मृत झालेले हनुमान पाटील केशरलाल पाटील हे दाेन्ही शेती व्यवसाय करायचे. ट्रॅक्टरचा सामान घेण्यासाठी ते चाेपडा येथे अाले हाेते, अशी माहिती गावकऱ्यांनी चाेपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दिली. 

चाळीसगावजवळ कारच्या धडकेने दोघांचा मृत्यू 
चाळीसगावातील डेरागर्डीजवळ शुक्रवारी सायंकाळी भरधाव कारने पायी चालणाऱ्या दोघांना उडवले. त्यात नितीन सुभाष देवरे (वय ४०) प्रवीणसिंग सांडू पवार (वय ६३) यांचा मृत्यू झाला. करगाव येथील नितीन देवरे प्रवीणसिंग पवार हे दोघेही धुळे रस्त्याने गावाकडे पायी चालले होते. या वेळी पाठीमागून येणारी भरधाव कार (एम.एच. १८ डब्ल्यू ७९२०)ने दाेघांना धडक दिली. या अपघातात हे दोघेही पादचारी गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी धुळे येथे हलवण्यात आले होते. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 
बातम्या आणखी आहेत...