आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Three Suspects Accused Arrested In Soham Joshi Extortion Case

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तिघा संशयित आरोपींना दिवस कोठडी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(संशयित गणेश धामणे, योगेश चौधरी यांना न्यायालयातून घेऊन जाताना पोलिस)
जळगाव- सोहम जोशी खंडणी प्रकरणातील तीन संशयित आरोपींना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. या वेळी तिघांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली असून, बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल दिला जाणार असल्याचे पोलिस अधीक्षकांनी सांगितले.
सोहम प्रकरणात गणेश धामणे, गणेश जगताप, मोहित चांगरे, नितीन जावळे आणि योगेश चौधरी यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. चांगरे चौधरी याचे अटकपूर्व जामिन अर्ज न्यायालयाने फेटाळल्यामुळे ते सोमवारी रामानंदनगर पोलिसांना शरण आले होते. त्यानंतर तिघांना मंगळवारी न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सरकार पक्षातर्फे अॅड.राजेश गवई यांनी, फिर्यादीतर्फे अॅड. आर. एम. भोकरीकर यांनी आरोपींतर्फे अॅड. कुणाल पवार, अॅड. मुकेश शिंपी, अॅड.दीपक कासार यांनी काम पाहिले.
जिल्हाधिकाऱ्यांना देणार अहवाल
जोशी प्रकरणाच्या तपासाचा अहवाल रामानंदनगर ठाण्याचे निरीक्षक प्रवीण वाडिले यांनी मंगळवारी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.सुपेकर यांच्याकडे सादर केला. त्याचा अभ्यास करून बुधवारी हा अहवाल जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांच्याकडे सादर केला जाणार आहे.
या प्रकरणात दोन तास युक्तिवाद झाला. यात सरकारतर्फे अॅड.गवई यांनी आरोपींकडून नोटरी केलेला स्टॅम्पपेपर, ५० हजार रुपये उसनवार दिलेले असताना ८० हजार रुपयांचे पोस्टडेटेड चेक, गुन्ह्यात वापरलेल्या गाड्या, फोटो आणि दोन आरोपी अजून फरार असल्याने पोलिस कोठडीची मागणी केली. तसेच फिर्यादीचे वकील भोकरीकर यांनी धनादेशप्रकरणी प्रत्येक आरोपीची भूमिका वेगळी असून, हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. त्यामुळे मोठे रॅकेट बाहेर येण्याची शक्यता आहे.
पाठपुरावा करावा लागल्याने आणि दबावामुळे तक्रार देण्यास उशीर लागला. त्याचप्रमाणे आरोपीने दाखल केलेल्या दोन्ही गुन्ह्यांत फिर्यादी स्नेहा जोशी यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. त्यामुळे पोलिस कोठडीची मागणी केली. बचाव पक्षातर्फे अॅड.कुणाल पवार यांनी संशयित योगेश चौधरीची, तर गणेश जगतापची बाजू अॅड.मुकेश शिंपी यांनी मांडली. गणेश धामणेतर्फे अॅड.दीपक कासार यांनी बाजू मांडली. त्यात त्यांनी ही फिर्याद विचारपूर्वक तयार केलेली असून, त्यात आर्थिक व्यवहार आहे. फिर्यादीने उसनवार घेतलेले पैसे परत द्यावे लागू नये म्हणून फिर्याद दिलेली आहे, असा युक्तिवाद केला.
तपासात कसूर होणार नाही
- सोहम जोशी प्रकरणाच्या तपासात कोणत्याही प्रकारची कसूर केली जाणार नाही. कोणावरही अन्याय होणार नाही; तपास योग्य पद्धतीने सुरू असल्याचे आरोपींना पोलिस कोठडी मिळाल्याने सिद्ध झाले आहे.
डॉ. जालिंदर सुपेकर, जिल्हा पोलिस अधीक्षक