आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाेरीच्या तयारीत असलेले तिघे ताब्यात, गस्तीदरम्यान पकडले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- घरफाेडीच्या उद्देशाने फिरणाऱ्या तीन संशयितांना तालुका पाेलिसांनी रविवारी गस्तीदरम्यान ताब्यात घेतले अाहे.

शहरात गेल्या दाेन महिन्यांपासून घरफाेड्यांचे प्रमाण वाढले अाहे. त्यामुळे िजल्हा पाेलिस अधीक्षक डाॅ. जालिंदर सुपेकर यांनी सर्व प्रभारी अधिकाऱ्यांची, गुन्हे शाेध पथकांची बैठक घेऊन गस्त वाढवण्याचे अादेश दिले अाहेत. रविवारी रात्री तालुका पाेलिस ठाण्याचे निरीक्षक सूर्यकांत पाटील, साहाय्यक पाेलिस निरीक्षक सागर शिंपी, जितेंद्र पाटील, प्रफुल्ल धांडे हे आव्हाणे शिवारात गस्त घालत होते. पहाटे ३.३० वाजता कचरा फॅक्टरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या सत्यम अपार्टमेंटजवळ त्यांना अक्षय भिकन निकम(वय २१), डिंगबर भगवान कोळी (वय ३०), विशाल राजेंद्र ठाकरे (वय २५, सर्व रा. शिवाजीनगर) हे संशयास्पदरीत्या फिरताना अाढळून आले. त्यांना रात्री फिरण्याबद्दल विचारले असता उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यांची झडती घेतल्यानंतर त्यांच्याजवळ स्क्रू ड्रायव्हर, हाताेडी, पकड, घरफाेडीसाठी लागणाऱ्या वस्तू अाढळून अाल्या. त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात अाली अाहे.

गाेलाणीत दगडफेक; अटकपूर्व फेटाळला
व्हाॅट्सअॅपवर अाक्षेपार्ह पाेस्ट टाकल्यामुळे गाेलाणी मार्केटमधील दगडफेकीतील मुख्य संशयित शेख शाकीर शेख जमील याने अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए.के.पटणी यांच्या न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला हाेता. ताे अर्ज साेमवारी न्यायालयाने फेटाळला.
सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी तर संशयितांतर्फे अॅड. कुणाल पवार यांनी काम पाहिले.

दुचाकी चाेरटा शहर पाेलिसांच्या ताब्यात
जिल्हाधिकारी कार्यालयात २९ जून राेजी दुचाकी चाेरी करताना कर्मचाऱ्यांनी सर्फराज कलिंदर तडवी (वय ३४, रा. दाैंड, जि. पुणे) चाेरट्याला पकडले हाेते. सध्या ताे न्यायालयीन काेठडीत अाहे. तसेच न्यायालयाच्या अावारातून जून राेजी सकाळी ११.३० ते दुपारी वाजेदरम्यान अफजल खान माेहंमद खान सिकवाल (वय ३२, रा. काेळीपेठ) यांच्या मालकीची दुचाकी (एमएच- १९, बीएच- ६८०) चाेरीला गेली हाेती. या प्रकरणात शहर पाेलिसांनी साेमवारी सर्फराज याला कारागृहातून ताब्यात घेतले अाहे.
बातम्या आणखी आहेत...