आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Three Water Pump Loss In Bhusawal Municipal Palika

भुसावळ नगरपालिकेच्या तीन पंपांची चोरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- पालिकेच्या रॉ वॉटर पंपिंग हाउसमध्ये असलेले तीन जुने पंप चोरीस गेल्याचा प्रकार उघडकीस आला. हे पंप काही आजी-माजी नगरसेवकांनीच लंपास केल्याची माहिती प्रभारी मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर यांना मिळाली आहे. या प्रकरणाची शहनिशा केल्यानंतर पुराव्यासह या लोकप्रतिनिधींवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत. यामुळे आजी-माजी नगरसेवकांमध्ये खळबळ उडाली आहे.

पालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर यांनी पालिकेच्या सर्व विभागांच्या प्रमुखांना जुन्या वस्तू आणि स्टोअर विभागात असलेल्या वस्तूंची यादी प्रशासनाकडे जमा करण्याचे आदेश दिले होते. या माहितीच्या आधारे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील तीन जुने वीजपंप गायब झाल्याचे निदर्शनास आले. काही आजी-माजी नगरसेवकांनी रातोरात रॉ वॉटर पंपिंग हाउसमधून पंप उचलून नेल्याची गुप्त माहिती यातून समोर आली. मात्र, याबाबत सबळ पुरावा नसल्याने हे प्रकरण थंडावले आहे. येत्या पंधरवड्यात पुरावे मिळणार असल्याचा पालिका प्रशासनाला विश्वास आहे. पुरावे मिळताच संबंधितांवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत.