आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैसे लांबवणाऱ्या तिघी महिला अखेर ताब्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - ट्रॅव्हल्सरिक्षातील प्रवाशांच्या पिशव्या पर्स लांबवणारी तिघा महिलांना एमआयडीसी पोलिसांनी शुक्रवारी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून २२ हजार रुपयांची रोकड जप्त कारण्यात आली आहे.

शहरात जुलै रोजी कंडारी येथील दांपत्याचे ट्रॅव्हल्समध्ये प्रवास करताना २१ हजार तर आदर्शनगरातील मकरा पार्कमधील सासू-सुनेचा ४३ हजारांचा तीन महिला एक लहान मुलगा असलेली टोळीने लांबविला होता. याप्रकरणी जिल्हापेठ एमआयडीसी ठाण्यात नोंद करण्यात आली होती. तसेच या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एमआयडीसी पोलिस ठाण्यात संशयितांच्या मागावर होते. शुक्रवारी दुपारी तीन महिलांसह मुलगा फिरत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. संशयितांना ओळखण्यात यश आले असून त्यांच्याकडून २२ हजार रुपये हस्तगत करण्यात आले आहे. शनिवारी फसवण्यात आलेल्या नागरिकांकडून ओळखपरेड करण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक एन.जे.कंजे यांनी सांगितले. ताब्यात घेतलेल्या तिन्ही महिलांना हिंदी, इंग्रजी मराठी भाषा बोलता येत नसून तपासासाठी दुभाषिकाला बोलावण्यात आले आहे. या महिला परराज्यातील आहेत, की जालना जिल्ह्यातील, याबाबत रात्री उशिरापर्यंत तपास सुरू होता.

बातम्या आणखी आहेत...