आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Three Writers Belles Include In 4th Standers Book, Divya Marathi

चौथीच्या पुस्तकात जळगाव जिल्‍ह्यातील तिघांच्या साहित्यकृतींचा समावेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता तिसरी व चौथीचे पाठय़पुस्तके नव्याने प्रकाशित झाले असून चौथीच्या मराठी बालभारतीच्या पाठय़पुस्तकात जिल्ह्यातील तिघांच्या साहित्यकृतींचा समावेश झाला आहे. यात एका बालसाहित्यिकांचा पाठ तर दोन कवींच्या कविता विद्यार्थ्यांना अभ्यासास आहे. बालभारतीत अहिराणी बोलीलाही प्रथमच स्थान मिळाले आहे.
येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता तिसरी व चौथीची पाठय़पुस्तके नव्याने प्रकाशित झाली आहेत. यात चौथीच्या मराठी बालभारती पाठय़पुस्तकात पाचोरा येथील नायब तहसीलदार व बालसाहित्यिक आबा गोविंदा महाजन यांचा ‘मला शिकायचंय’ हा पाठ तर राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त मोहाडी (ता.जामनेर) येथील उपशिक्षक डॉ. अशोक कौतिक कोळी यांच्या ‘धूळ पेरणी’ व एरंडोल येथील सेवानिवृत्त शिक्षिका शकुंतला पाटील यांच्या ‘मन्हा खान्देस्नी माटी’ या कवितांचा समावेश आहे. या पुस्तकात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, बाबा भांड, प्रेमचंद, भा.रा.तांबे, संत चोखामेळा, संत तुकाराम, संत शेख महंमद यासारख्या दिग्गजांच्या लेखनाचा समावेश आहे. त्यांच्या सोबतच जिल्ह्यातील तिघांच्या साहित्यकृतींचा समावेश होणे, ही अभिमानास्पद बाब आहे.
शेतकरी जीवनाचे आशादायक चित्र : या अगोदर डॉ.अशोक कोळी यांची ‘हिंमत द्या थोडी’ ही कविता सहावीच्या मराठी बालभारती पुस्तकात आहे. आता चौथीच्या पुस्तकात समाविष्ट केलेल्या ‘धूळ पेरणी’ या कवितेतून शेतकरी जीवनाचे आशादायक चित्र उभे केलेले आहे. त्यांची ‘कूड’, ‘आसूड’, ‘पाडा’, ‘कुंधा’ आदी ग्रंथसंपदा आहेत.