आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यात ‘अॅप’द्वारे पीक कापणीचे १,७१७ प्रयोग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जिल्ह्यात खरीप, रब्बी उन्हाळी असे तिन्ही हंगामातील पीक कापणीचे प्रयोग यापुढे सुधारित पद्धतीने होऊन त्याची सर्व माहिती संकलित केली जाणार आहे. यासाठी खास अॅपची निर्मिती केली असून त्याद्वारे सर्व माहिती केंद्र शासनाला पाठवली जाणार आहे. त्यामुळे पीक नुकसानीची भरपाई मिळण्यास विलंब होणार नाही. यंदा सुधारित पद्धतीनुसार जिल्ह्यात १,७१७ प्रयोग केले जाणार असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक विवेक सोनवणे यांनी दिली.
सुधारित पीक कापणीच्या प्रयोगानुसार यंदाच्या खरीप हंगामात अँड्राॅइड अॅपचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. पीक कापणी प्रयोगाची माहिती केंद्र शासनाला ऑनलाइन पाठवण्यात येणार आहे. पूर्वी मॅन्युअली पद्धतीने पीक कापणी प्रयोगाचा अहवाल तयार करून शासनाला पाठवला जात होता. परंतु, नव्या पद्धतीमुळे विनाविलंब अचूक माहिती केंद्र शासनाला पाठवण्यात येणार आहे. पीक कापणी प्रयोग जिल्हा परिषद, कृषी महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. त्याबाबत त्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. पीक कापणीवरुन उपलब्ध उत्पादनाच्या सरासरी आकडेवारीवरून आधारित असेल. एखाद्या निर्धारित क्षेत्रातील विमा संरक्षित पिकाचे त्या वर्षीचे दर हेक्टरी सरासरी उत्पन्न उंबरठा उत्पन्नापेक्षा कमी आले, तर त्या क्षेत्रातील सर्व विमाधारक शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे गृहित धरण्यात येईल. एका विमा घटकातील उंबरठा उत्पन्न किंवा विमाधारक शेतकऱ्यांचे नुकसान झाले, असे गृहित धरण्यात येणार आहे. पंतप्रधान विमा योजनेंतर्गत राष्ट्रीय कृषी विमा योजनेतील तरतुदीनुसार नुकसान भरपाई निश्चित केली आहे. पावसातील खंड, अवर्षण, गारपीट, तसेच खळ्यात पिकाचे नुकसान झाल्यानंतरही नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळणार आहे.

जि. प., कृषी, महसूल अधिकाऱ्यांना प्रशिक्षण
जरएखाद्या विमा क्षेत्र घटकात निर्धारित संख्येप्रमाणे पीक कापणी प्रयोग पिकाखालील क्षेत्राअभावी होऊ शकले नाही, तर संबंधित विमा कंपन्या राज्य शासनाच्या संमतीने शेजारील विमा क्षेत्र घटकाचे उत्पन्न गृहित धरून किंवा उच्चतम विमा क्षेत्र घटकाचे उत्पन्न गृहित धरून निश्चित केले जाईल.
बातम्या आणखी आहेत...