आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सातोडमध्ये वीज पडून विद्यार्थी ठार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुक्ताईनगर - आई-वडिलांनाभेटण्यासाठी शेतात गेलेल्या अाकाश काेळी (वय १४) या विद्यार्थ्यावर वीज कोसळली. त्यात तो जागीच ठार झाला. बुधवारी तालुक्यातील सातोड शिवारात ही घटना घडली. सातोड शिवारातील आपल्या शेतात सुरेश शंकर कोळी हे पत्नीसह कपाशी लागवड करत होते. या वेळी मुलगा आकाश हा त्यांना भेटावयास आला होता. नेमके याचवेळी आकाशच्या अंगावर वीज कोसळून तो जागीच ठार झाला. आकाशने नुकताच मुक्ताईनगरातील जे. ई. स्कूलच्या इयत्ता आठवीच्या वर्गात प्रवेश घेतला होता. आकाशच्या पश्चात आई-वडील दोन बहिणी असा परिवार आहे.