आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वढोदा रेंजमध्ये संरक्षित व्याघ्र प्रकल्प होणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- मुक्ताईनगर तालुक्यातील 60 चौरस किलोमीटरच्या वढोदा रेंजमध्ये (इस्लामपूर ते पूरनाड नाका) ‘संरक्षित व्याघ्र प्रकल्पा’ची औपचारिक घोषणा राज्याच्या वनविभागाचे प्रधान सचिव प्रवीणसिंग परदेशी यांनी शनिवारी केली. या घोषणेचे पर्यावरणप्रेमींमधून जोरदार स्वागत झाले.

विदर्भातील मेळघाट ते खान्देशातील अनेर डॅमदरम्यान ‘टायगर कॉरिडॉर’च्या मागणीसाठी सातपुडा बचाव समिती आग्रही आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी गेल्या अधिवेशनात मुक्ताईनगर जंगलाचा समावेश व्याघ्र प्रकल्पांतर्गत अभयारण्यामध्ये करावा, अशी मागणी केली होती. या सर्व प्रयत्नांचे फलित म्हणून परदेशी यांनी पट्टेदार वाघाचे अस्तित्व असलेल्या वढोदा वनक्षेत्राची स्वत: पाहणी केली. चारठाणा येथे नकाशाचे अवलोकन करताना अंबाबरवा ते अनेरदरम्यान जंगलाची स्थिती जाणून घेतली. यानंतर परिसरातील संयुक्त वनव्यवस्थापन समित्यांची मते जाणून घेत वढोदा रेंजमध्ये ‘संरक्षित व्याघ्र प्रकल्पा’ची घोषणा केली. सातपुडा बचाव समितीचे निमंत्रक राजेंद्र नन्नवरे, धुळे वनविभागाच्या मुख्य वनसंरक्षक सुनीता सिंग आदींनी टाळ्यांच्या गजरात घोषणेचे स्वागत केले.