आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पट्टेदार वाघिणीच्या मृत्यूने खळबळ, डोलारखेडा जंगलातील घटना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: वाघिणीच्या मृतदेहाचा पंचनामा करताना अधिकारी.
मुक्ताईनगर - पट्टेदार वाघांच्या अस्तित्वाने संपूर्ण महाराष्ट्रात लौकिकप्राप्त झालेल्या वढोदा संवर्धन राखीव क्षेत्राला बुधवारची पहाट धक्कादायक ठरली. डोलारखेडा वनहद्दीतील कंपार्टमेंट क्रमांक ५७२मध्ये खैराच्या झाडाखाली एका नाल्यामध्ये पट्टेदार वाघिणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. वाघिणीची शिकार झाली की, विषप्रयोग झाला अथवा नैसर्गिक मृत्यू झाला? या दिशेने तपास सुरू झाला आहे.

डोलारखेडा जंगलात आठ ते १० दिवसांपासून पट्टेदार वाघाचा मृतदेह पडलेला असल्याची माहिती एका गुराख्याने सुकळी येथील स्थानिकांना दिली. मात्र, याबाबत वाच्यता झालेली नव्हती. वनविभागाला याची कुणकुण लागताच, बुधवारी सकाळी वढोद्याचे वनक्षेत्रपाल मधुकर नेमाडे यांनी कर्मचाऱ्यांसह डोलारखेड्यातील कंपार्टमेंट ५७२ पिंजून काढले. या वेळी त्यांना वायला-चिंचखेडा बुद्रूक (ता.मुक्ताईनगर) गावाला लागून असलेल्या नाल्यात खैराच्या झाडाखाली वाघिणीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला.

अधिकाऱ्यांचाताफा दाखल : वाघिणीचामृतदेह आढळल्याची माहिती वनक्षेत्रपाल नेमाडे यांनी तातडीने जळगाव येथील वरिष्ठांना कळवली. यानंतर अनुक्रमे सहायक वनसंरक्षक रेवती कुलकर्णी, उपवनसंरक्षक यू. जी. कडलग, व्याघ्र संवर्धन चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते राजेंद्र नन्नवरे, धुळे वनवृत्ताच्या मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) सुनीता सिंग घटनास्थळी दाखल झाले. तत्पूर्वी, वन्यजीव संस्थेचे विवेक देसाई, पक्षिमित्र गणेश सोनार, अजय पाटील यांनीही घटनास्थळ गाठले होते.

असे आहे वर्णन : कर्मचाऱ्यांनीदुपारी १२ वाजता सुरू केलेली पंचनाम्याची प्रक्रिया सव्वातास चालली. सव्वातासाच्या या प्रक्रियेत मृत वाघिणीची डोक्यापासून ते शेपटीपर्यंतची लांबी २.३३ मीटर, खांद्यापासून पायापर्यंतची उंची ९५ सेंटिमीटर, अंगावरील काळ्या पट्ट्यांमधील अंतर सेंमी., मागील डाव्या पायाचे पंजे ११ सेंमी. लांब सेंटिमीटर रुंदीचे होते. चेहरा पूर्णपणे कुजला होता. तसेच पायाची नखे शाबूत होती. मात्र, जबड्यातील दात आढळले नाहीत, अशी कुजबुज होती.

व्हीसेराफोरेन्सिक लॅबमध्ये : राष्ट्रीयव्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या (एनटीसीए) गाइड लाइननुसार तज्ज्ञांच्या उपस्थितीत मुक्ताईनगर पंचायत समितीचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. डी. बी. चव्हाण, उचंदा येथील डॉ. एस. एल. तमळूकर, वढोदा येथील डॉ. एस. एस. मोरे यांनी वाघिणीचे शवविच्छेदन केले. प्रथमदर्शनी वाघिणीच्या मृत्यूचे कारण समजू शकले नाही. नाशिक येथील फॉरेन्सिक लॅबमधून व्हीसेराचा अहवाल आल्यानंतर नेमके कारण समजेल, असे डॉ.चव्हाण यांनी सांगितले.

अधिकाऱ्यांचा ताफा दाखल : वाघिणीचामृतदेह आढळल्याची माहिती वनक्षेत्रपाल नेमाडे यांनी तातडीने जळगाव येथील वरिष्ठांना कळवली. यानंतर अनुक्रमे सहायक वनसंरक्षक रेवती कुलकर्णी, उपवनसंरक्षक यू. जी. कडलग, व्याघ्र संवर्धन चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते राजेंद्र नन्नवरे, धुळे वनवृत्ताच्या मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) सुनीता सिंग घटनास्थळी दाखल झाले. तत्पूर्वी, वन्यजीव संस्थेचे विवेक देसाई, पक्षिमित्र गणेश सोनार, अजय पाटील यांनीही घटनास्थळ गाठले होते.