आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ख्वाजामियाँ झोपडपट्टीच्या जागेवर बाजारासाठी विक्रेत्यांना ‘टाइम झाेन’, रस्त्याची व्यवस्था करणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शहरातील भाजीपाला खाद्यपदार्थ विक्रेत्यांची गेल्या सहा महिन्यांपासून हाेणारी हेळसांड थांबवण्यासाठी ख्वाजामियाँ  झोपडपट्टीच्या जागेवर व्यवस्था करण्यात येत अाहे. महापाैर अायुक्तांसह पदाधिकाऱ्यांनी साेमवारी सपाटीकरणाच्या कामाची पाहणी करून नियाेजनही केले.
 
यात ‘टाइम झाेन’ ठरवून देणार असून, सायंकाळी वाजेपर्यंत भाजीविक्रेते, तर रात्री १० वाजेपर्यंत खाद्यपदार्थ विक्रेत्यांना जागा दिली जाणार अाहे. यासाठी खास डिझाइन तयार केले जात अाहे. पार्किंग, पाणी, लाइट साफसफाई अशा संपूर्ण व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी खास एका कनिष्ठ अभियंत्याची नियुक्ती करणार अाहे. 
 
रस्त्यांवरील हाॅकर्समुळे वाहतुकीला अडथळा निर्माण हाेत असल्याने सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार कारवाई केली जात अाहे. वर्षभरापूर्वी सुरू झालेल्या कारवाईचा अाता शेवट हाेताना पाहायला मिळत अाहे. गेल्या वर्षभरापासून जागांची निवड हाॅकर्सची व्यवस्था यात ताळमेळ बसत नसल्याने पालिका प्रशासनाने अापल्याच मालकीची रिंगराेडला लागून असलेली ख्‍वाजामियां झोपडपट्टीची जागा भाजीबाजारासाठी निश्चित केली अाहे.
 
या जागेचे गेल्या आठवडाभरापासून सपाटीकरण सुरू हाेते. सपाटीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर पुढच्या नियाेजनाच्या दृष्टीने महापाैर नितीन लढ्ढा, उपमहापाैर ललित काेल्हे, अायुक्त जीवन साेनवणे यांनी पाहणी केली. या वेळी शहर अभियंता दिलीप थाेरात, सहायक अभियंता सुनील एस.भाेळे, विद्युत विभागप्रमुख एस.एस.पाटील, पाणीपुरवठा विभागाचे अभियंता सुनील पी.भाेळे, अाराेग्य अधिकारी डाॅ. विकास पाटील, नगररचना विभागाचे अभियंता इस्माईल शेख, अभियंता संजय पाटील उपस्थित हाेते. 
 
जागेची अाखणी, रस्त्याची व्यवस्था करणार 
शहरातील रस्त्यांवर बसणाऱ्या भाजीपाला विक्रेत्यांसह बळीरामपेठ सुभाष चाैकातील विक्रेत्यांची या जागेवर व्यवस्था केली जाणार अाहेे. विक्रेत्यांसाठी जागेची अाखणी, ग्राहकांना चालण्यासाठी मुरूम टाकून रस्त्याची व्यवस्था केली जाणार अाहे. याच ठिकाणी सकाळी ते सायंकाळी या वेळेत भाजीपाला विक्रेत्यांना व्यवसाय करू दिला जाणार अाहे, तर सायंकाळी ते रात्री १० वाजेपर्यंत खाद्यपदार्थ विक्रेत्यांना जागा उपलब्ध करून दिली जाणार अाहे.
 
‘टाइम झाेन’मुळे सर्वच विक्रेत्यांना व्यवसाय करणे शक्य हाेणार अाहे. त्यामुळे ग्राहकांनाही एकाच ठिकाणी खरेदी करणे शक्य हाेणार अाहे, तर रस्त्यांवरील वाहतुकीची काेंडी टळणार अाहे. या ठिकाणी टाॅवर परिसर, रेल्वेलाइनला महामार्गाला लागून असलेल्या सर्व परिसरातील हाॅकर्सचा समावेश केला जाणार अाहे. ज्यांना बसायचे नसेल, त्यांना पालिकेच्या नियोजित जागेवर बसता येईल; परंतु रस्त्यांवर काेणालाही व्यवसाय करू दिला जाणार नसल्याचे सांगितले जात अाहे. 
 
पक्की गटार बांधणार 
रिंगरोडकडून गणेश काॅलनीकडे जाताना डाव्या हाताला गटार बांधली असली तरी, मैदानाच्या बाजूला कच्ची गटार अाहे. त्यामुळे मनपा फंडातून गटारीचे बांधकाम करण्यावरही चर्चा करण्यात अाली. मैदानावर अातल्या बाजूला ३० मीटरपर्यंत पार्किंगची साेय केली जाणार अाहे. त्यामुळे ग्राहकांना रस्त्यावर वाहने उभी करण्याची गरज भासणार नाही. शहरात अातापर्यंत येणाऱ्या सर्व अडचणी डाेळ्यासमाेर ठेवून उपाययोजना करण्याची तयारी पालिका प्रशासन करीत अाहे. 
 
स्वतंत्र अभियंत्या मार्फत लक्ष 
सायंकाळपर्यंतभाजीपाला विक्रेत्यांना त्यानंतर रात्री १० वाजेपर्यंत खाद्यपदार्थ विक्रेत्यांना अापला व्यवसाय करता यावा; त्या ठिकाणी लाइटची व्यवस्था, पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्त्यांची गरज यावर लक्ष ठेवण्यासाठी महापालिकेच्या कनिष्ठ अभियंत्याची यासाठी खास नियुक्ती केली जाणार अाहे. या अभियंत्याने बाजारातील प्रत्येक गाेष्टीवर लक्ष ठेवून नियाेजन करणे गरजेचे ठरणार अाहे. 
 
 
बातम्या आणखी आहेत...