जळगाव- र्शमसाधना बॉम्बे ट्रस्ट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयात इनोव्हेशन व इंटरप्रेन्युरशिप सेंटर व नॅशनल सायन्स अँण्ड टेक्नॉलॉजी बोर्डातर्फे तीन दिवसीय कॅम्प झाला. त्यात व्यवसाय शिक्षणाच्या संधी, उद्योजक होण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.
सुहान्स केमिकल्सचे संचालक संदीप काबरा प्रमुख पाहुणे होते. व्यवस्थापन मंडळ सदस्य शशिकांत कुलकर्णी, संचालक संजय शेखावत, प्रभारी प्राचार्य एस.आर.सुरळकर, डॉ.आय.डी.पाटील उपस्थित होते. विद्यार्थ्यांना व्यवसाय शिक्षणाच्या संधी याविषयी डॉ.अनिल डोंगरे यांनी माहिती दिली. उत्पादन आणि नोकरीची निवड कशी करावी यासह उद्योजक होण्यासाठी आवश्यक गोष्टी याविषयी मान्यवरांनी माहिती दिली. ग्रीन ग्लोबल बायोटेक्नोलॉजीचे संचालक हर्षल बोरसे यांनी सरकारी नियम पालनासाठी आवश्यक असणार्या तत्त्वाविषयी माहिती दिली. नियम, हुकूम उद्योगासाठी लागणारे साहस याबद्दलही विविध प्रात्यक्षिकांतून माहिती दिली. शुभा शर्मा व र्शुती आहुजा यांनी प्रास्ताविक केले. डी.डी.पुरी यांनी आभार मानले. प्रा.जयंत पारपल्लीवार, प्रा.गौरव खोडपे, प्रा. डी.जी.परदेशी यांनी नियोजन केले.