आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दूध चोरीतील चौघे पोलिसांच्या ताब्यात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - दूधसंघातील दुधाच्या हेराफेरीत व्यवस्थापन, सुरक्षा यंत्रणेसह अजून वरिष्ठ पातळीवर कोणती यंत्रणा सक्रिय आहे? या िदशेने पोिलसांचा तपास सुरू झाला आहे. याप्रकरणी साेमवारी चाैघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
संघातून बाहेर जात असलेले दूध कुठे जात होते? याचा शोध घेण्यासाठी सहायक उपनिरीक्षक नथ्थू साळुंखे, पोिलस नाईक संजय शेलार, इम्रान सय्यद यांच्या पथकाने साेमवारी वाहतुकीचा ठेका घेतलेल्या लक्ष्मी ट्रान्सपोर्टचा व्यवस्थापक पाचोरा तालुक्यातील लोहारी येथील अहमद नथ्थू काकर सार्वे येथील नागराज दोधू पाटील यांना ताब्यात घेतले. टँकर खाली करण्याची जबाबदारी असलेल्या बापुराव माधवराव चाैधरी टँकर सफाई करणाऱ्या ज्ञानेश्र्वर दिवाकर धामणे यांना पाेलिसांनी ताब्यात घेतले.
दरम्यान, यापूर्वी अटक केलेल्या ितघांना न्या. ए. डी. बाेस साेमवारी न्यायाललयात हजर करण्यात आले होते, या वेळी त्यांना एक दिवसाची पाेिलस काेठडी सुनावण्यात अाली अाहे.