आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभियांत्रिकी पदवीसाठी पुन्हा संधी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - पॉलिटेक्निकपदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश अर्ज भरू शकणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा संधी उपलब्ध झाली असून, तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे विहित मुदतीत वाढ करण्यात आली असून, जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरता येणार आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना अर्ज भरता आले नाही, त्यांनी एआरसी सेंटरवरून अर्ज करून कागदपत्रांची तपासणी करून घ्यायची आहे.
तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे अभियांत्रिकी पदविका (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमासाठी प्रवेशप्रक्रिया सुरू झाली असून, जुलै रोजी संचालनालयातर्फे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जाहीर करण्यात आली. डीटीईच्या www.dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळावर गुणवत्ता यादी जाहीर झाली असून, विद्यार्थ्यांना ती पाहता येईल. तंत्रनिकेतनसाठी २९ जूनपर्यंत विद्यार्थ्यांना एआरसी सेंटरवरून ऑनलाइन प्रवेश अर्ज करण्याची मुदत होती. परंतु, विद्यार्थ्यांचा कमी प्रतिसाद लाभल्याने डीटीईतर्फे प्रवेश अर्ज भरण्याच्या विहित मुदतीत वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार अाहे.

डीटीईतर्फे सर्व एआरसी सेंटरला मुदत वाढीची माहिती कळविण्यात आली असून, विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज भरून घेतले जात आहे. त्यामुळे सध्या केंद्रांवर विद्यार्थ्यांची गर्दी दिसत आहे.
विभागात १७ हजार प्रवेश
नाशिकविभागात तंत्रनिकेतन महाविद्यालयांतून २०७३६ अॅप्लिकेशन किटची विक्री झाली होती. त्यातील १७३६० प्रवेश अर्ज निश्चित झाले आहे. बुधवारी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जाहीर झाली असून, विद्यार्थ्यांना दोन दिवस अर्जांतील दुरुस्ती करण्याची मुदत देण्यात अाली आहे. त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होईल. त्यानंतर कॅप राउंडद्वारे प्रवेशप्रक्रिया पार पडणार आहे.
अशी होईल प्रक्रिया
जुलैप्रोव्हिजनल मेरिट लिस्ट
ते दुरुस्ती करण्याची मुदत
जुलै प्रवेश अर्ज भरण्याची वाढीव मुदत
जुलै अंतिम गुणवत्ता यादी होणार जाहीर
ते १० कॅप राउंड जुलै (ऑप्शन फॉर्म भरणे)
१३ प्रवेशाची पहिली यादी जुलै होणार जाहीर
२१ ते २४ दुसरा कॅप राउंड
२७ जुलै प्रवेशाची दुसरी यादी
१० ऑगस्ट काउन्सिलिंग राउंड