आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्मचाऱ्यांचे शोषण थांबवणार, सीअारएमएसचे अध्यक्ष डॉ.आर.पी. भटनागर यांचे प्रतिपादन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वर्किंग कमिटीच्या बैठकीत बोलताना डॉ.आर.पी.भटनागर, सोबत पदाधिकारी. - Divya Marathi
वर्किंग कमिटीच्या बैठकीत बोलताना डॉ.आर.पी.भटनागर, सोबत पदाधिकारी.
भुसावळ - रेल्वे कर्मचाऱ्यांच्या समस्या दूर करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाशी शेवटपर्यंत लढा देणार अाहे. मध्य रेल्वेतील लाख २६ हजार रेल्वे कर्मचाऱ्यांनी सीआरएमएसवर टाकलेला विश्वास सार्थ ठरवू. रेल्वेने खासगीकरणाचे धोरण अवलंबले आहे. त्यामुळे राेजंदारी कर्मचाऱ्यांचे बहुतांश ठेकेदारांकडून होणारे शोषण थांबवू, असे आश्वासन सीअारएमएसचे अध्यक्ष डाॅ. अार.पी. भटनागर यांनी दिले.
बसस्थानक मार्गावरील सीअारएमएसच्या कार्यालयात रविवारी सकाळी ११ वाजता सीआरएमएसच्या वर्किंग कमिटीची बैठक झाली, या वेळी ते बोलत होते. वार्षिक अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या बैठकीत मध्य रेल्वेच्या पाचही विभागातील पदाधिकारी उपस्थित होते. भटनागर म्हणाले की, प्रत्येक पातळीवरील समस्यांचा बारकाईने अभ्यास केला जात आहे. या समस्यांचा निपटारा कशाप्रकारे करता येईल याचे नियोजन केले जात आहे. रेल्वेतील खासगीकरणाला सीअारएमएसचा विराेध अाहे. रेल्वेने बरीच कामे ठेकेदारांकडे साेपवली अाहेत. बहुतांश ठेकेदार राेजंदारीवरील मजुरांचे शाेषण करतात अाहेत. अशा कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून दिला जात अाहे. ईसीसी बँकेतील कामकाजाबाबत २५ जणांची समिती नियुक्त करून अाढावा घेणार आहे, असे त्यांनी सांगितले. कार्यकारी अध्यक्ष अार.एन. चांदूरकर, काेषाध्यक्ष अार.जी. निंबाळकर महामंत्री प्रवीण बाजपेयी, साेलापूर विभागाचे मंडळ सचिव अार. विश्वनाथ हजर हाेते.
अधिवेशनात लेखाजोखा
दुपारच्या सत्रात ठेकेदार मजदूर संघाच्या बैठकीचे अायाेजन झाले. ठेकेदारी पद्धतीवर चालणाऱ्या कामांची स्थिती कामावर असलेल्या मजुरांच्या समस्यांबाबत चर्चा झाली. तर सायंकाळी वर्किंग कमिटीची पुन्हा बैठक झाली. यात गेल्यावर्षी झालेल्या ठरावांचा आढावा घेण्यात आला. किती ठरावांवर अंमलबजावणी झाली नाही याचा लेखाजाेखा साेमवारी हाेणाऱ्या अधिवेशनात मांडला जाणार अाहे. अधिवेशनासाठी सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

प्रत्येक विभागाला अधिकार द्यावे
मध्यरेल्वेतील पाच विभागांना बँकेच्या निवडणुकीत स्थानिक स्तरावर युतीबाबत अधिकार प्रदान करावे, असा मुद्दा बैठकीत मांडण्यात आला. तसेच केंद्र शासनाच्या नोटबंदीच्या निर्णयाचे सर्व पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. या निर्णयामुळे प्रत्येक क्षेत्रातील आर्थिक गैरव्यवहारांवर आळा बसेल, असे मत डी.के. साेनी, भुसावळ विभागाचे सचिव एस.बी. पाटील, पी.एन.नारखेडे यांनी व्यक्त केले.
बातम्या आणखी आहेत...