आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्री अाज धुळ्यात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे साेमवारी जिल्हा दाैऱ्यावर येत अाहेत. मुख्यमंत्री सकाळी १०.१० वाजता विमानाने गाेंदूर विमानतळावर येतील. तेथून शासकीय वाहनाने धुळे तालुक्यातील पुरमेपाडा येथील जलयुक्त शिवार कामाची पाहणी करतील. नंतर शिंदखेडा तालुक्यातील हतनूर,विखरण, जाेगशेलू येथील कामाची पाहणी करतील. दुपारी १२ वाजता दाेंडाईचा येथील अामदार जयकुमार रावल यांच्या निवासस्थानी थांबतील.दुपारी२.४५ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होईल. दुपारी ४.१५ वाजता जळगाव जनता बॅंकेच्या उद‌्घाटनाचा कार्यक्रम हाेऊन सायंकाळी रवाना हाेतील.