आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुसावळात ११५ मतदान केंद्रांवर २५० पाेलिस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - तालुक्यातील तीन गटात १४ आणि सहा गणात २३, असे एकूण ३७ उमेदवार रिंगणात आहेत. या उमेदवारांच्या भवितव्यासाठी गुरुवारी सकाळी ७.३० ते सायंकाळी वाजेपर्यंत मतदान होईल. तत्पूर्वी, बुधवारी निवडणुकीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना इव्हीएमसह मतदान साहित्याचे वितरण करण्यात आले. ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून त्यात ११ पोलिस अधिकारी, २५० पाेलिस, एसअारपी अारसीपी प्लाॅटूनचा समावेश आहे. चार झाेनमध्ये सात सेक्टरच्या माध्यमातून हा बंदाेबस्त असेल. 
 
भुसावळ तालुक्यात एकूण ११५ मतदान केंद्र अाहेत. त्यापैकी ४१ केंद्र उपद्रवी अाहेत. या ठिकाणी बंदोबस्तासाठी विशेष नियोजन करण्यात आले असून बुधवारी हा फौजफाटा नेमून दिलेल्या गावांमध्ये रवाना झाला. त्यात धुळे जळगाव येथील पाेलिस हाेमगार्डचा समावेश आहे. तालुक्यातील प्रत्येक मतदान केंद्रावरील बंदाेबस्ताचे नियोजन भुसावळ डीवायएसपी कार्यालयाने केले असून बुधवारी सकाळी सर्व पाेलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना कर्तव्यात कोणतीही कसूर होणार नाही, याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच शहर तालुक्यात आवश्यक तेथे नाकाबंदी करून वाहने, संशयीतांच्या तपासणीचे आदेश देण्यात आले. त्यानुसार बुधवारी सकाळी ११ ते दुपारी आणि सायंकाळी ते रात्री या वेळात वरणगाव बस थांबा, फुलगाव, फेकरी टाेल नाका, साकेगाव वाय पाॅइंट,नाहाटा कॉलेजजवळ, कुऱ्हा (पानाचे) गांधी पुतळ्याजवळ नाकाबंदी करण्यात आली. 

{सकाळी ७.३० वाजेपासून सुरू होईल मतदान 
झाेन : याझोनचे प्रमुख निरीक्षक चंद्रकांत सराेदे असून त्यांच्या सेक्टर मध्ये सहायक निरीक्षक माराेती मुळूक यांचा समावेश आहे. त्यांच्याकडे निंभाेरा, पिंप्रीसेकम, साकरी, खडका, किन्ही, खंडाळा, कन्हाळा खुर्द, कन्हाळा बुद्रूक, तर सेक्टर ६चे उपनिरीक्षक सचिन खामगड प्रमुख आहेत. त्यांच्याकडे कुऱ्हा, मांडवेदिगर, भिलमळी, महादेव माळ, शिंदी, माेढाळा, वराडसीम, सुनसगाव, बेलव्हाय, गाेंभी, गाेजाेरे ही गावे आहेत. 

झाेन: याझोनचे निरीक्षक एकनाथ पाडळे हे प्रमुख आहेत. त्यांच्याकडील सेक्टर ५ची जबाबदारी उपनिरीक्षक अंगत नेमाने यांच्याकडे सोपवण्यात आलेली आहे. त्यात कंडारी, फेकरी या भुसावळ शहराला लागून असलेल्या गावांची जबाबदारी आहे. ही संवेदनशील गावे आहेत. 
झोन : पहिल्याझाेनचे प्रमुख वरणगावचे सहायक पाेलिस निरीक्षक दिलीप गांगुर्डे आहेत. त्यांच्या झाेनमध्ये सेक्टर मध्ये उपनिरीक्षक नीलेश वाघ यांचा समावेश आहे. त्यांच्याकडे दर्यापूर, आयुध निर्माणी वरणगाव, हतनूर, टहाकळी, मानपूर, काहूरखेडा, बाेहर्डी बुद्रूक ही गावे अाहेत. सेक्टर २मध्ये उपनिरीक्षक प्रदीप ठुबे यांच्याकडे फुलगाव, अजंनसाेडे, कठाेरा खुर्द, कठाेरा बुद्रूक, सावतर निंभाेरा, जाडगाव, मन्यारखेडा ही गावे अाहेत. 

झाेन: प्रमुखनिरीक्षक बाळासाहेब गायधनी असून त्यांच्या सेक्टर ३ची जबाबदारी उपनिरीक्षक अार.ए. पठाण यांच्याकडे आहे. सेक्टर ४मध्ये उपनिरीक्षक नरेंद्र साबळे असून त्यांच्याकडे साकेगाव, जाेगलखेडा, भानखेडा, वांजाेळा, खेडी, चाेरवड, मिरगव्हाण ही गावे अाहेत. 

दृष्टिक्षेपात माहिती 
^मतदान प्रक्रिया नक्कीचसुरळीतपणे पार पाडू. यादृष्टीने आम्ही आवश्यक तयारी केली आहे. मतदान साहित्यासह कर्मचारी आणि नियोजनानुसार बंदोबस्तावरील पोलिस नेमून दिलेल्या केंद्रांवर हजर झाले आहेत. -श्रीकुमार चिंचकर,निवडणूक निर्णय अधिकारी 
बातम्या आणखी आहेत...