आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अादिशक्तीचा आजपासून दिवस जागर; शहरात ठिकठिकाणी होणार स्थापना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- नवरात्राेत्सवास गुरुवारपासून सुरुवात हाेत असून यासाठी बाजारही सज्ज झाला अाहे. यानिमित्ताने शहरात अादिशक्तीचा नऊ दिवस जागर हाेणार अाहे. गुरुवारी विधिवत स्थापना झाल्यानंतर नऊ दिवस देवीची मनोभावे पूजा अर्चा करण्यात येणार अाहे. शहरातील विविध सार्वजनिक मंडळांचीही तयारी पूर्ण झाली आहे. 
 
भुसावळ-जळगाव महामार्गावरील कालिंका देवी, इच्छादेवी, मायादेवी, चिमुकले राम मंदिरातील देवीचे मंदिर, भवानी मातेच्या मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या मंदिरांच्या बाहेर गुरुवारपासून खण-नारळ ओटी भरणारे विक्रेते दुकान थाटणार आहे. बहिणाबाई उद्यानाजवळ, सुभाष चौक, फुले मार्केट परिसरात शुक्रवारी पूजा साहित्यांची दुकाने थाटण्यात आली होती. सर्वपित्री अमावस्यामुळे दुपारनंतर खरेदीसाठी गर्दी झाली होती. 
 
कुळाचारा नुसार सर्व करावे : नवरात्रीचे जे नियम ग्रहण असते त्याची सुरुवात हाेते. तसेच कुळाचारानुसार प्रथेप्रमाणे सर्व करावे. पहिले तीन दिवस महाकालीचे तर नंतरचे तीन दिवस महालक्ष्मीचे अाणि अखेरचे तीन दिवस महासरस्वतीचे असून त्यानुसार देवीची आराधना केल्यास उत्तम असते. उपवासही अापल्या शारीरीक क्षमतेनुसार करावे, असे माैक्तिक शुक्ल यांनी सांगितले. 
 
बातम्या आणखी आहेत...