आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सानिया कादरी गोळीबार प्रकरणी आज सुनावणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - सानिया कादरी गोळीबार प्रकरणात बुधवारी सानियाची आई अफसाना कादरी बहीण जिया आणि भाऊ समिर तसेच मनोज वालेचा यांच्यावर गोळीबार करण्यासाठी चिथवल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. यात जर सरकार किंवा बचाव पक्षाला साक्षीदार तपासायचे असतील तर त्यांनी अर्ज करावा, असे न्यायालयाने सांगितले होते. त्यानुसार गुरुवारी बचाव पक्षातर्फे डॉ. किशोर चौधरी, डॉ. कुणाल निकम आणि शैलेश चौधरी यांची पूर्ण तपासणी घेण्याचा अर्ज दिला. मात्र, सरकारपक्षाचे वकील गोपाळ जळमकर यांनी यावर हरकत घेतली. त्यामुळे याप्रकरणी शुक्रवारी युक्तिवाद होणार आहे.