आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ललित काेल्हेंच्या तडीपारीचा प्रस्ताव; आज सुनावणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - मनसेचे मनपातील गटनेते ललित काेल्हे यांना त्यांच्यावर असलेल्या अाराेपांमुळे दाेन वर्षे जिल्ह्यातून तडीपार करण्याचा प्रस्ताव अाहे. काेल्हे यांच्या खुलाशासाठी राेजी सकाळी १० वाजता अपर पाेलिस अधीक्षकांकडे हजर राहण्यासंदर्भात राेजी नाेटीस बजावली अाहे.

नगरसेवक काेल्हे यांच्यावर मुंबई पाेलिस अधिनियम १९५१ च्या कलम ५६(१)(ब) अन्वये कारवाई करण्याचे निश्चित करून त्यांच्याविराेधात असलेल्या अाराेपांच्या अाधारे दाेन वर्षांसाठी जिल्ह्यातून तडीपार करण्याचा प्रस्ताव अाहे. त्याच्या खुलाशासाठी अपर पाेलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी २६ डिसेंबरला सकाळी १० वाजता उपस्थित राहण्याचे अादेश दिले हाेते. मात्र, काेल्हे त्या वेळी हजर राहिले नाही. त्यामुळे त्यांना जानेवारीला सकाळी १० वाजता हजर राहण्याची नाेटीस बजावण्यात अाली अाहे.

गैरहजर राहिल्यास चौकशी एकतर्फी पूर्ण करणार
जानेवारीरोजी कोल्हेंना साक्षीदार, जामीनदारासह हजार रुपयांंच्या वैयक्तिक जातमुचलक्यासह हजर राहण्याचे अादेश नाेटीसद्वारे देण्यात अाले अाहेत. तसेच या वेळी उपस्थित राहिल्यास चाैकशीचे काम एकतर्फी पूर्ण करण्यात येणार असल्याचे नाेटीसमध्ये नमूद करण्यात अाले अाहे.