आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Today Heavy Rain In Jalgaon District, Weather Department Forecast

जिल्ह्यात आज अतिवृष्टीचा इशारा, हवामान खात्याचा अंदाज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव/मुक्ताईनगर - दाेन दिवसांपासून जिल्ह्यावर रुसलेल्या पावसाने शेतकऱ्यांना अाशा लावली आहे. जून महिन्यात अातापर्यंत सरासरी मिलिमीटरदेखील पाऊस झालेल्या मुक्ताईनगर तालुक्यात मंगळवारी वीज पडून पाच महिला एक पुरुष शेतमजूर जखमी झाला. दरम्यान, गेल्या अाठवड्यात ४८ तासांत दिलेला अतिवृष्टीचा इशारा फाेल ठरल्यानंतर हवामान खात्याने पुन्हा एकदा बुधवारी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला अाहे.
शहापूर तालुक्यातील वारोली येथील शेतमजूर अनुसया एकनाथ कचरे (वय ४०), सुनीला काशिनाथ कचरे (वय २६), कल्पना रघुनाथ कचरे (वय १९), गजानन सीताराम भिस्ते (वय ४०), कामिनी गजानन भिस्ते (वय ३५), मथुराबाई शिवराम सावळे (वय २५) हे सर्व मुक्ताईनगर तालुक्यातील बेलसवाडी शिवारातील गट क्रमांक २००मधील कालेखाॅं सुजातखाॅं यांच्या शेतात काम करीत होते. अचानक वीज पडून सर्व सहा शेतमजूर जखमी झाले. त्यांच्यावर मुक्ताईनगर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. निवासी नायब तहसीलदार सुभाष सोनवणे यांनी जखमींची विचारपूस केली. तसेच मुक्ताईनगर तालुक्यातील लोहारखेडा येथे बैलाचाही वीज पडून मृत्यू झाला.

जिल्ह्यातील पाऊस
जळगावतालुक्यात मिलिमीटर, एरंडाेल १६.२५, धरणगाव ९.१०, भुसावळ ८.५०, यावल २.६, मुक्ताईनगर ०.२५, बाेदवड ३.३३, चाळीसगाव ७, भडगाव ३, अमळनेर १०.१२, पाराेळा २.८०, तर चाेपड्यात ७.१४ मिलिमीटर पाऊस झाला.

दुपारनंतर मुसळधार?
जिल्ह्यातबुधवारी मुसळधार पाऊस हाेणार असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला अाहे. बुधवारी सायंकाळी वाजेनंतर जिल्हाभरात मुसळधार पाऊस हाेईल. त्यानंतर २० जून राेजी अतिवृष्टी हाेऊ शकते, असा इशारा वेधशाळेने दिला अाहे.