आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळ्यात आज मराठा समाजाचा मूक मोर्चा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - शहरात मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी उद्या बुधवारी क्रांती मूकमाेर्चा काढण्यात येणार अाहे. दहा लाख नागरिक यात सहभागी हाेतील, असा अंदाज अायाेजकांनी वर्तवला अाहे. त्यामुळे पाेलिस बंदाेबस्तातही वाढ करण्यात अाली अाहे. या मोर्चाच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवण्यासाठी तीन ड्रोन कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. मोर्चात हमीभाव तसेच शेतकऱ्यांच्या समस्यांकडेही लक्ष केंद्रित केले जाणार आहे.

मोर्चावर लक्ष ठेवण्यासाठी तीन ड्रोन कॅमेरे राहणार आहेत. तसेच मोर्चादरम्यान वैद्यकीय मदतीसाठी सात रुग्णवाहिका आणि वैद्यकीय मदतीसाठी समाजातील २०० डॉक्टर तत्पर राहणार आहेत. आतापर्यंत राज्यभर असलेल्या शिस्तीचे दर्शन धुळ्यातही व्हावे यासाठी तीन हजार ५०० स्वयंसेवक तैनात राहतील.त्यांच्या मदतीला गटप्रमुख गटप्रमुखांवर विभागप्रमुख कार्यरत राहणार आहेत.
बातम्या आणखी आहेत...