आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापाैरांची अाज घाेषणा; उपमहापाैराबाबत उत्सुकता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- महापालिकेच्या१२ व्या महापाैरपदी ललित काेल्हे यांच्या बिनविराेध निवडीची अाैपचारीक घाेषणा गुरूवारी सकाळी ११.१५ वाजता हाेणार अाहे. यासाठी जिल्हाधिकारी किशाेर राजेनिंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे अायाेजन करण्यात अाले अाहे. 
 
गेल्या अाठवडाभरापासून महापाैैर निवडीबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली हाेती. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसाच्या पूर्वसंध्येला प्रमुख विराेधक भाजपने ललित काेल्हेंना पाठींबा जाहीर केला. त्यामुळे महापाैर निवड बिनविराेध हाेणार हे दाेन दिवसांपूर्वीच निश्चित झाले हाेते. त्यानुसार भाजपच्यावतीने सप्टेंबर राेजी एकही अर्ज दाखल झालेला नाही. दरम्यान, गुरूवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकाऱ्याच्या उपस्थितीत काेल्हे यांची महापाैरपदी बिनविराेध निवड झाल्याची घाेषणा हाेणार अाहे. 
 
महापाैर बिनविराेध निवड हाेणार असल्याने उपमहापाैर स्थायी समिती सभापतीपदाची निवड देखील बिनविराेध हाेणे जवळजवळ निश्चित मानले जात अाहे. महापालिकेतील प्रमुख पद असलेल्या महापाैरपदासाठी भाजपने उमेदवार दिल्याने अाता उर्वरित दाेन्ही पदांसाठी समर्थन देण्याची शक्यता अाहे. खाविअाच्यावतीने उपमहापाैरपदासाठी ज्याेती इंगळे, दत्तात्रय काेळी गणेश बुधाे साेनवणे यांच्या नावाची चर्चा सुरू अाहे. उपमहापाैरपद हे काेळी समाजाला द्यायचे की मराठा समाजाला बाबत अद्याप अंतिम निर्णय हाेऊ शकलेला नाही. त्यामुळे उपमहापाैरपदी काेणाला संधी मिळते त्यावर स्थायी समितीचे गणित अवलंबून राहणार अाहे. 
 
बातम्या आणखी आहेत...