आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नितीन गडकरी अाज जळगावात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जिल्ह्यातील नवीन राष्ट्रीय महामार्गाच्या घाेषणेसह जुन्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६चे रुंदीकरण, काॅंक्रिटीकरण केंद्रीय मार्ग निधीमधील कामांचे भूमिपूजन साेमवारी हाेत अाहे. त्यानिमित्त केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे जळगावात येत असून, त्यांच्या हस्ते दुपारी वाजता सागर पार्कवर विविध विकास कामांचा शुभारंभ हाेणार अाहे. जिल्ह्यातील रस्ते विकासासाठी १६ हजार ५८२ काेटी रुपयांचा निधी मिळणार अाहे. जळगाव शहरात तीन उड्डाणपूलही उभारले जाणार अाहेत.