आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

४० हजार नागरिकांच्या साक्षीने अाज रावणदहन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - विजयादशमीनिमित्तमंगळवारी सायंकाळी ७.३० वाजता मेहरूण तलावावर रावणाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन हाेणार अाहे. या कार्यक्रमासाठी सुमारे ४० हजार नागरिकांची उपस्थिती राहील, असा अंदाज पाेलिस प्रशासनाने वर्तविला अाहे. त्यानुसार त्यांनी पाेलिस बंदाेबस्तात वाढ केली अाहे. सायंकाळी ते रात्री ९पर्यंत तांबापुरापासून पाचाेऱ्याकडे जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांच्या मार्गात बदल केला अाहे.
मेहरूण तलावावरील रावणदहनाचा कार्यक्रम बघण्यास दरवर्षी नागरिकांची प्रचंड गर्दी हाेते. यंदा यात वाढ झाली असून, गर्दीच्या अाकड्याचा अंदाज ४० हजारांवर पाेहाेचला अाहे. या वेळी कुणाचीही गैरसाेय अनुचित प्रकार घडू नये म्हणून पाेलिस प्रशासनातर्फे ४०हजार
नागरिकांच्या..
जय्यत तयारी करण्यात अाली अाहे. शहर वाहतूक शाखेतर्फे सायंकाळी ते रात्री वाजेपर्यंत वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात अाला अाहे. शिरसाेलीकडून येणारी वाहतूक दर्ग्याकडून माेहाडी रस्त्यावर, तेथून कच्च्या रस्त्यावरून डी-मार्टमार्गे वळवण्यात अाली अाहे. रावणदहनाच्या कार्यक्रमात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण हाेऊ नये म्हणून तगडा पाेलिस बंदाेबस्त तैनात करण्यात अालेला अाहे. त्यात पाेलिस उपअधीक्षक, पाेलिस निरीक्षक, सहायक पाेलिस निरीक्षक उपनिरीक्षक, १२८ कर्मचारी, स्ट्रायकिंग फाेर्स असा बंदाेबस्त राहील, असे जिल्हा पाेलिस अधीक्षक डाॅ. जालिंदर सुपेकर यांनी सांगितले.

जिल्ह्यातील बंदाेबस्त : विजयादशमीच्यादिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्ह्यात २७ ठिकाणी पथसंचलन अायाेजित करण्यात अालेले अाहे. त्यासाठी पाेलिस अधीक्षक, अप्पर पाेलिस अधीक्षक, पाेलिस उपअधीक्षक, ३५ पाेलिस निरीक्षक, ५६ सहायक पाेलिस निरीक्षक, ९८ उपनिरीक्षक, २१०० कर्मचारी, १००० हाेमगार्ड, अारसीपी प्लाटून, क्यूअारटी फाेर्स, राज्य राखीव दलाची कंपनी, स्ट्रायकिंग फाेर्स असा बंदाेबस्त असणार अाहे.
बातम्या आणखी आहेत...