आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आज चालवा आपली मर्जी, बंदाेबस्तासाठी ७०० पाेलिस कर्मचारी तैनात .

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - मतदानप्रक्रियेसाठी७०० पोलिस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात असतील. शुक्रवारी पोलिस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी अधिकाऱ्यांना बंदोबस्ताबाबत सूचना केल्या होत्या.
रविवारी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांची गस्त सुरू करण्यात आली असून चोख बंदोबस्त ठेवला जाणार आहे.

असा असेल बंदाेबस्त : बंदाेबस्तासाठी१० झाेनमध्ये १० पथके नियुक्त असतील. अप्पर पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, डीवायएसपी रोहिदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पाच पाेलिस निरीक्षक, राज्य राखीव दल,अारसीपी आणि क्युअारबी आणि स्ट्रॅकिंग फोर्स आणि एसआरपीएफची प्रत्येकी एक पाेलिस तुकडी,जळगाव वाहतूक शाखेचे ४० कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. यासोबतच श्वान पथक, डीएसबी एलसीबीचे प्रत्येकी एक पथक, वरणगाव, नशिराबाद, नियंत्रण कक्ष आणि मुख्यालयातील कर्मचाऱ्यांसह अाैरंगाबाद नाशिक येथील पाेलिसांचा बंदाेबस्त आहे. तसेच शहरात ठिकठिकाणी फिक्स पॉइंट लावण्यात आले आहेत.
पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवारी मतदानप्रक्रिया होणार आहे. प्रचाराच्या रणधुमाळीत सर्व राजकीय पक्षांनी आपली भूमिका मतदारांसमोर मांडली असली तरी रविवारी शहरातील लाख ५८ हजार ६२७ भुसावळकर मतदारांची मर्जी चालणार आहे. लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी १० तर २४ प्रभागांतून नगरसेवकपदासाठी रिंगणात असलेल्या २५२ उमेदवारांचे भवितव्य आज मतदान यंत्रात (ईव्हीएम) बंद होणार आहे.
पालिकेची यंदाची पंचवार्षिक निवडणूक अंत्यत चुरशीची आहे. गेल्या आठवड्यापासून शहरात प्रचाराची रणधुमाळी सुरू होती. यात भाजप, जनाआधार विकास पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, बहुजन समाज पार्टी, एमआयएम आणि अपक्षांनी प्रचाराची तोफ डागली. शनिवारी रात्री प्रचार बंद होऊन आता रविवारी मतदान प्रक्रिया पूर्ण होणार आहे. अत्यंत चुरशीच्या या निवडणुकीत लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी चुरशीची लढत होणार आहे. भाजपचे रमण देविदास भोळे, जनाआधार विकास पार्टीचे सचिन संतोष चौधरी, राष्ट्रवादीचे उमेश कालिदास नेमाडे, शिवसेनेचे अॅड. श्याम श्रीगोंदेकर, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे मो. मुन्नवर खान, बहुजन समाज पार्टीचे पांडुरंग लोखंडे, एमआयएमचे शेख फिरोज रहेमान, अपक्ष उमेदवार परशुराम बोंडे, आरिफ गनी, गोकुळ कारडा आदी १० उमेदवार रिंगणात आहेत. लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी १० उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत भाजपचे रमण देविदास भोळे आणि जनाआधार विकास पार्टीचे उमेदवार सचिन संतोष चौधरी यांच्यात आहे. अत्यंत चुरशीच्या या निवडणुकीत मतांचे विभाजन, सामाजिक समिकरणे आणि अर्थकारण या विषयांचा मोठा प्रभाव दिसून आला. रविवारी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत शहरातील विविध मतदान केंद्रांवर ईव्हीएम यंत्रांद्वारे मतदानप्रक्रिया होईल. यासाठी प्रशासनाने तयारी केली असून भुसावळकरांना रविवारी आगामी पाच वर्षांसाठी आपली मर्जी चालवण्याची संधी मिळणार आहे.
बातम्या आणखी आहेत...